कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या समस्‍या सोडवा – आमदार सुधाकर अडबाले

– शिक्षण उपसंचालक यांच्यासोबत समस्‍या निवारण सभा

नागपूर :- नागपूर विभागाअंतर्गत कार्यरत कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या समस्‍या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. त्‍या सोडविण्यासाठी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने समस्‍या निवारण सभा पार पडली. या सभेत कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या समस्‍या तात्‍काळ सोडवा, असे निर्देश आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षण उपसंचालक यांना दिले.

नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध प्रलंबित विषयांवर चर्चा करण्यासाठी आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्याकडे समस्‍या निवारण सभा लावली. ही सभा धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहात नुकतीच पार पडली. विशेष म्‍हणजे ही समस्‍या निवारण सभा चार तास चालली.

या सभेत कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची सामूहिक व वैयक्‍तिक समस्‍यांसह सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देयके, ३० जूनला सेवानिवृत्त उच्‍च माध्यमिक शिक्षकांना १ जुलैची वेतन वाढ मंजूर करणे, जीपीएफ हिशोब चिठ्ठ्या, दरमहा १ तारखेला वेतन अदा करणे, यासह इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. सेल्फ फायनान्स ज्‍यु. कॉलेजची तपासणी करा आणि पटसंख्या नसेल त्‍यांची ज्‍यु. कॉलेजची मान्‍यता रद्द करा. कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या प्रलंबित समस्‍या तात्‍काळ निकाली काढा, असे निर्देश आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षण उपसंचालक यांना यावेळी दिले.

यावेळी शिक्षण उपसंचालक उल्‍हास नरड, सहा. उपसंचालक लोखंडे, शेखर पाटील, राऊत, सोनटक्‍के, विज्‍युक्टा महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर, कोषाध्यक्ष डॉ. अभिजित पोटके, नागपूर ग्रामीण सचिव डॉ. नितीन देवतळे, नागपूर शहर सचिव डॉ. गजानन धांडे, विमाशि प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, शहर अध्यक्ष विठ्ठल जुनघरे, जिल्‍हा अध्यक्ष (ग्रा.) अनिल गोतमारे, विज्‍युक्टा कार्याध्यक्ष डॉ. चेतन हिंगणेकर, डॉ. विनायक बुजाडे, मार्गदर्शक प्रा. नामदेवराव घोळसे, भंडारा जिल्हा अध्यक्ष प्रा. मार्तंडराव गायधने, प्रा. राजेंद्र दोनाडकर, प्रा. संजय लेनगुरे, प्रा. अशोक गायधनी, गोंदिया जिल्हा अध्यक्ष प्रा. पोमेंद्रकुमार कटरे, प्रा. रोमेंद्र बोरकर, प्रा. अरविंद शरणागत, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष डॉ. प्रवीण चटप, प्रा. राजेंद्र खाडे, प्रा. अशोक हेपट, प्रा. प्रमोद भोयर, चंद्रपूर जिल्हा सचिव प्रा. प्रमोद उरकुडे, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष प्रा. भाऊराव गोरे, प्रा. सूर्यकांत भोंगळे, वर्धा जिल्हा अध्यक्ष प्रा. नुरसिंग जाधव, प्रा. जयंत ढगळे, प्रा. प्रशांत चौधरी, प्रा. भेंडारकर, नागपूर महिला आघाडी जिल्हा सचिव प्रा. डॉ. शालिनी तेलरांधे, धनराज राऊत, भूषण तल्‍हार, मंगेश घवघवे व नागपूर विभागातील शिक्षक, विज्‍युक्टा, विमाशी संघाचे सदस्य उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आज कांशीराम यांचा स्मृतिदिन

Mon Oct 9 , 2023
नागपूर :- बामसेफ, बीआरसी, डीएस-फोर व बीएसपी चे संस्थापक मान्यवर कांशीराम यांचा 17 वा स्मृतिदिन आज 9 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10.30 वाजता नागपुरातील मान्यवर कांशीराम मार्गावरील बसपाच्या विभागीय कार्यालयात संपन्न होत आहे. कही हम भूल न जाये या बसपाच्या राष्ट्रीय अभियानाचे जनक मान्यवर कांशीराम यांचाच स्मृतिदिन याच अभियानांतर्गत त्यांच्याच कार्यालयात होणार असल्याने बसपाचे प्रदेश, जिल्हा, शहर, विधानसभा, सेक्टर व बूथ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com