विदर्भ खो-खो संघाचे सराव शिबिर काटोल मध्ये

काटोल :- काटोल मधील नामांकित विदर्भ युथ क्रीडा व सांस्कृतिक मंडळ काटोलच्या मैदानावर विदर्भ राज्य सीनियर खो-खो संघाचे सराव शिबिर दिनांक 16/11/ 2022 ते 19/11/ 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आले होते पांढरकवडा (यवतमाळ) येथे 55 वी विदर्भ राज्य खो-खो अजिंक्यपद स्पर्धा दिनांक ११ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत पार पडली. या स्पर्धेत विदर्भातील 11 जिल्ह्याच्या संघांनी सहभाग नोंदविला होता, या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंची निवड विदर्भ राज्याच्या संघात करण्यात आली. निवड समितीमार्फत निवड केलेल्या संघाचे स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर हे काटोल येथील विदर्भ युथ क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. आणि प्रशिक्षण शिबिर संपन्न करून विदर्भ राज्याचा संघ उस्मानाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरिता 19 नोव्हेंबर 2022 ला दुपारी चार वाजता रवाना होणार आहे. 55 वी राष्ट्रीय खो-खो स्पर्धा ही दिनांक 20 ते 24 नोव्हेंबर 2022 या कालावधीत उस्मानाबाद येथे पार पडणार आहे.

निवड झालेल्या विदर्भ राज्य खो-खो संघाला शुभेच्छा देण्यासाठी स्पर्धा पूर्व प्रशिक्षण कालावधीत विदर्भ युथ क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अनुप खराडे, सचिव अनिल धांडे, संदीप ठाकरे, अमित काकडे, प्रमोद बावणे, विक्रम पालीवाल,  जगदाळे व मंडळाचे माजी खेळाडू उपस्थित होते. स्पर्धेत सहभागी होणारे संघाला विदर्भ खो-खो असोसिएशन चे अध्यक्ष सुहास पांडे, सचिव  सुधीर निंबाळकर, कोषाध्यक्ष  अशोक मोरे, सदस्य टी ए सोर, गोविंद राऊत, सहसचिव  संजय इंगळे, जी बी रघुवंशी व समस्त विदर्भ खो-खो असोसिएशन ने राष्ट्रीय खो-खो स्पर्धेकरिता विदर्भ पुरुष संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com