नागपुर – शिवाजी नगर जिमखानाच्या बास्केटबॉल मैदानावर सुरू असलेल्या शिवाजी नगर जिमखाना बास्केटबॉल लीग 2022 अंतर्गत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खेळाडूंच्या आयांसाठी विशेष स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
शूटिंग स्पर्धा, ड्रीब्लिंग स्पर्धा, टनेल रेस अशा विविध स्पर्धांचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले. विशेष म्हणजे मुली व त्यांचे आई यांचे एकत्र बास्केटबॉल चे सामने आयोजित करण्यात आले. यामध्ये जवळजवळ तीनशे हून अधिक महिलांनी सहभाग नोंदविला.
गेली अनेक वर्षे आया आपल्या मुला मुलींना बास्केटबॉल सरावा दरम्यान किवा स्पर्धे दरम्यान टाळ्या वाजवून त्यांचा उत्साह वाढवीत होत्या.
आज मुले आप आपल्या आईंना बास्केट टाकण्यासाठी चीयर करताना दिसत होते. उत्साहाच्या वातावरणात विजेत्यांना परितोषिकांचे वितरण करण्यात आले.