-खोटे दलाल डब्बा ट्रेडिंग का करतात…
नागपुर :- जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर सतर्क राहणे गरजेचे आहे.
‘डब्बा ट्रेडिंग’ म्हणजे काय ?
तुमचा ब्रोकरही यात सहभागी आहे का ?
शेअर बाजारात गुंतवलेले तुमचे सर्व पैसे सुरक्षित आहेत की नाही ?
असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. ‘डब्बा ट्रेडिंग’ला ‘ब्लॅक मार्केट’ किंवा शेअर्सचा ‘सट्टा’ म्हणूनही ओळखले. या प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये, शेअर्सच्या खरेदी आणि विक्रीसाठी रोख व्यवहार ब्रोकर (ज्याला डब्बा ब्रोकर असेही म्हणतात) आणि गुंतवणूकदार यांच्यात होतो. रोख व्यवहारांमुळे, हे व्यवहार बँकिंग आणि सेबी इत्यादी नियामकांच्या कक्षेबाहेर आहेत, म्हणून लोक कर वाचवण्यासाठी डब्बा ट्रेडिंग करतात. आता या प्रकारच्या शेअर ट्रेडिंगमधील डब्बा ब्रोकरची ना कोणतीही नोंदणी आहे. ना त्याच्याकडे सेबीचा कोणताही परवाना आहे. म्हणजे तो बेपत्ता झाला तर त्याला फक्त गुन्हे शाखाच पकडू शकते. आपण त्याला पकडू शकत नाही. याचे कारण त्यावर कोणतेही नियामक नियंत्रण नाही. डब्बा ट्रेडिंगची पद्धतही खूप सोपी आहे, त्यामुळे लोक त्याकडे आकर्षित होतात. डब्बा ट्रेडिंग म्हणजे शेअर बाजार किंवा सेबीच्या कक्षेबाहेरील शेअर ट्रेडिंग.
डब्बा ट्रेडिंगचा हिशोब सरळ आहे. यामध्ये गुंतवणूकदाराचा नफा हा ब्रोकरचा तोटा आणि ब्रोकरचा नफा हा गुंतवणूकदाराचा तोटा असतो. आणि त्यात सरकारचे नुकसान नेहमीच होते, कारण हे सर्व व्यवहार रोखीने होतात. दुसरे म्हणजे नियामकाच्या कक्षेबाहेर, त्यामुळे सरकारला कराचा फटका सहन करावा लागतो. भारतातील शेअर बाजाराशी संबंधित कायद्यानुसार ‘डब्बा ट्रेडिंग’ पूर्णपणे बेकायदेशीर आहे आता तुम्हाला डब्बा ट्रेडिंग, डब्बा ब्रोकर आणि सरकारचे नुकसान समजले असेल. पण ते कसे टाळायचे? तुमचा ब्रोकर ‘डब्बा ब्रोकर’ नाही हे कसे ओळखायचे ?
दुसरा प्रश्न तुमच्या मनातही असेल की लोक ‘डब्बा ट्रेडिंग’ का करतात ? हे सुद्धा थोड्या सोप्या भाषेत समजून घेऊया.
सर्वप्रथम, डब्बा ट्रेडिंगमध्ये केवळ गुंतवणूकदारच नाही तर ब्रोकरचाही कर वाचतो. त्यामुळे लोक त्याकडे आकर्षित होत आहेत. दुसरीकडे रोखीच्या व्यवहारामुळे कोणताही हिशोब ठेवावा लागत नाही, म्हणजे ज्यांच्याकडे ‘काळा पैसा’ आहे, त्यांची चांदीच झाली आहे.
डब्बा ट्रेडिंगपासून कसे वाचायचे
तुमच्या स्टॉक ब्रोकरची सेबीकडे नोंदणी आहे की नाही याची खात्री करून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. दुसरे, शेअर्सचे व्यवहार रोखीने करू नका. त्याच वेळी, नेहमी डीमॅट स्वरूपात शेअर्सची खरेदी आणि विक्री करा . यासाठी, अस्सल ब्रोकर अॅप किंवा टूल किंवा सॉफ्टवेअरचा आधार घ्या, कारण डब्बा ब्रोकर ट्रेडिंगसाठी स्वतःचे विकसित सॉफ्टवेअर वापरतात.