स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारे व्यासपीठ – मुख्याध्यापक सतीश कसरे

– खेळ हा विद्यार्थी जीवनाचा अविभाज्य अंग आहे – मुख्याध्यापक सतीश कसरे

कामठी :- विद्यार्थ्यांमध्ये उपजतच काही गुण असतात ते शाळेत दाखल झाल्यानंतर त्यांचे अंगी असलेल्या कला गुणांना वाव देण्यासाठी शाळांमधून विविध कार्यक्रम व उपक्रम राबविले जातात .त्याचाच एक भाग म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन आणि या स्नेहसंमेलनातुन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना एक व्यासपीठ मिळते तसेच ‘आरोग्यम धनसंपदा ‘या म्हणीचे महत्व आपण सर्वाना माहिती आहे.निरोगी शरीरासाठी आपल्याला व्यायाम केले पाहिजे .खेळ खेळले पाहिजे.खेळामुळे शिस्त ,परिश्रम,संघ भावना, नेतृत्व यासारख्या गुण वाढीसाठी चालना मिळते त्यामुळे खेळ हा विद्यार्थी जीवनाचा अविभाज्य अंग आहे.असे मत हरदास मुलामुलींची प्राथमिक शाळाचे मुख्याध्यापक सतीश कसरे यांनी शाळेत आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.

हरदास मुलामुलींची प्राथमिक शाळा कामठी येथे आयोजित पाच दिवसिय वार्षिक स्नेहम्मेलन कार्यक्रमाचे उदघाटन ज्येष्ठ समाजसेविका रेखा भावे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी रजनि लिंगायत,अजय कदम,दिपंकर गणवीर, राजू भागवत,अनुभव पाटील,मनीष डोंगरे,उदास बन्सोड, सुभाष सोमकुवर प्रामुख्याने उपस्थित होते.या पाच दिवसीय वार्षिक स्नेहसमेलन अंतर्गत क्रीडा स्पर्धा,प्रजासत्ताक दिन सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रम, वेशभूषा स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आले होते तसेच आनंद मेळावा सह वनभोजन कार्यक्रम घेण्यात आला.या आयोजित स्पर्धामधील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.

या वार्षिक स्नेहसमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून सिस्टर निर्मला मॅडम,प्रभारी मुख्याध्यापक देवेंद्र जगताप , मुख्याध्यापक राजेश गजभिये, मुख्याध्यापिका अंबरीन फातमा,चिचघरे सर,मस्के सर आदी उपस्थित होते. या पाच दिवसीय वार्षिक स्नेहसम्मेलन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक शाळेचे मुख्याध्यापक सतीश कसरे,क्रीडा विभाग प्रमुख मनोज तातोडे,सांस्कृतिक विभाग प्रमुख वर्षा सावरकर, ज्योती गजघाटे, सरिता रामटेके, नंदा बन्सोड, ज्योत्स्ना निकोसे आदींनी मोलाची भूमिका साकारली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आयुषी रतूड़ी ने लगातार सात स्वर्ण पदक जीतकर इतिहास रचा

Thu Feb 1 , 2024
नागपूर :- गणेशनगर नंदनवन नागपुर महानगर पालिका स्केटिंग रिंग में दक्षिण नागपुर के विधायक मोहन मते द्वारा आयोजित भव्य आमदार क्रीड़ा महोत्सव २०२३/२४ में आयुषी अरविंद रतूड़ी ने ११ वर्ष बीगर स्केटिंग प्रतियोगिता में इंडियन स्केटिंग एकेडमी एवं अग्नि स्केट रेसर्स की तरफ से प्रतिभागी बनकर शानदार प्रदर्शन करते हुए स्वर्ण पदक जीतकर इतिहास रच दिया ज्ञात हो कि आयुषी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com