लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग कर्मचारी करणार २५४ मतदान केंद्रांचे नियंत्रण

मुंबई :- येत्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्रे असणार आहेत. राज्यभरात एकूण २५४ मतदान केंद्राचे नियंत्रण दिव्यांग कर्मचारी करणार आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारसंघात दिव्यांगांसाठी मतदान केंद्रे असावीत यावर भर दिला असून ‘दिव्यांग नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्यात येणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ३० मतदान केंद्रांचे नियंत्रण दिव्यांग कर्मचारी करणार आहेत. जळगावमध्ये २२, पुण्यामध्ये २१, ठाण्यामध्ये १८ आणि नाशिकमध्ये १५ दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. अकोला, कोल्हापूर, लातूर, पालघर, परभणी, रायगड अश्या ६ जिल्ह्यात प्रत्येकी १ दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्र असणार आहे. गडचिरोली, सिंधुदुर्ग आणि वाशिम या जिल्ह्यात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्र नसेल.

या वर्षी मतदार यादीमध्ये एकूण ६,०४,१४५ इतके दिव्यांग मतदार चिन्हांकित आहेत. त्यापैकी ज्या मतदारांच्या दिव्यांगत्वाचे प्रमाण ४० टक्केपेक्षा जास्त असेल अशा मतदारांपैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

दिव्यांग मतदारांसाठी (PwDs) सक्षम ॲप

भारत निवडणूक आयोगाने या वर्षी दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा या हेतूने “सक्षम” हे ॲप उपलब्ध करुन दिलेले आहे. त्या माध्यमातुन तसेच विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या कालावधीत दिव्यांगांसाठी विशेष शिबिरे राबवून जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांची नोंदणी करुन घेण्यात आली आहे. आजमितीस ६,०४,१४५ इतक्या मतदारांची नावे त्यांच्या मागणीनुसार दिव्यांग मतदार म्हणून चिन्हांकित करण्यात आली आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारतीय नववर्ष स्वागत समितीचे गुढीपाडव्याचे सोळावे वर्ष साजरे करणार सोमवारी

Mon Apr 8 , 2024
नागपुर :- भारतीय नववर्ष स्वागत समिती इतवारी भाग यांच्या वतीने गुढीपाडव्या च्या दिवशी महीला अभिनंदन स्कूटर रॅली सख्यांनो हर्षोल्लासात नववर्षाचे स्वागतासाठी महीला अभिनंदन स्कूटर रॅली सोमवार, दिनांक 8 एप्रिल 2024 ला दुपारी 3.30 वाजता. आग्याराम मंदिर गणेशपेठ येथुन रॅलीची सुरवात होईल तर पोद्दारेश्वर राम मंदिर नागपुर येथे रॅलीचे समापन होईल. घोषवाक्य स्पर्धा 2 बक्षिस, स्कूटर सजावट स्पर्धा 2 बक्षिस, उत्कृष्ट […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com