वंचित बहुजन आघाडी चे विविध मागण्यासाठी नारे निदर्शने

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कोराडी :- वंचित बहुजन आघाडी महादुला, कोराडी सर्कल च्या वतीने दि. 28/08/2023 ला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक टि पाॅईंट महादुला येथे विधानसभा प्रमुख सी. सी. वासे यांच्या नेतृत्वात विविध मागण्यासाठी जन आक्रोश नारे निदर्शने करण्यात आले.यात प्रमुख मागण्या औष्णिक वीज केंद्रामध्ये स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळण्यात यावे, महादुला टि पाॅईंट येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर याचे 3 कोटी लागत च्या बावनकुळे यांच्या आश्वासना नुसार स्मारक बनविण्यात यावे, c. S. R. पाॅलिसी नुसार मोफत शुद्ध पाणी व विज निशुल्क मिळण्यात यावे, घरघुती विज दर आणि गॅस सिलेंडर चे दरवाढ कमी करण्यात यावे आणि महादुला येथील अतिक्रमण धारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे यशा प्रकारचे निवेदन औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता, विज वितरण सहाय्यक अभियंता आणि मुख्याधिकारी न. पं. महादुला यांना देण्यात आले. यावेळी जि. अध्यक्ष दिलीप दुपारे, जि. महासचिव प्रशांत नगरकर, विदर्भ संयोजक भगवान भोंडे, महिला अध्यक्ष विश्रांती रामटेके, कामठी शहर अध्यक्ष दिलीप वासनिक, ता. महासचिव प्रशांत वाघमारे, ता. प्रवक्ते जगदीश रंगारी, ता.संघटक राजेश ढोके, रवि वानखेडे,महादुला शहर अध्यक्ष विशाल सोनवणे, दयानंद कांबळे, पवनकुमार अंभोरे, अनिकेत मेश्राम, अरुण शेंडे, महेश साखरे,आनंद बागडे,रीता जामगडे, शालु सहारे, प्रतिक्षा गेडाम, लिना निकोसे, अमिता इंगोले, माया मानवटकर, मालन बन्सोड, शोभा वासे, यशोधरा मेश्राम आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या पसंतीचे राज्य - फडणवीस

Tue Aug 29 , 2023
नागपूर :- महाराष्ट्र विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीमध्ये पहिल्या पसंतीचे राष्ट्र ठरले आहे. राज्यात गुंतवणूक वाढत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर सोमवारी रात्री माध्यमांशी बोलताना त्यांनी पहिल्या तीन महिन्यात गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र अव्वल असल्याचे अहवालात पुढे आले असल्याचे सांगितले. राज्यात सत्ता परिवर्तनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राला थेट विदेशी गुंतवणुकीत अग्रेसर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com