कत्तलखान्यात जाणाऱ्या ट्रकमधून ३० जनावरांची सुटका – 22,85,000/- माल जप्त

सावनेर :- पोलीस निरीक्षक मारुती मुळुक यांना मुखबीर द्वारे खबर मिळाली की, पांडुरना सावरगाव घुबळमेट मार्ग वरुन ट्क्र कमांक CG-04- JB-1573 या वाहनांमध्ये अवैधरित्या कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक केली जात आहे. अशा खबरे वरून पोलिस कर्मचारी सह मोहपा फाटा, वरील नाकाबंदी लावून वाहण्याचे तपास केली असता दिनांक 30-12-2019 चे सकाळी 07/45वा. चे दरम्यान एक 10 चक्का CG-04- JB-1573 ट्रक हे वाहन घुबळमेट मार्ग ने सावनेर कडे येताना दिसले. नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांना समोर पाहून आरोपींनी ट्रक आधीच उभा करून पळ काढला. ट्रक पाहणी करीता दोन पंच बोलावून पंचा समक्ष पाहणी केली असताना 26 नग जिवंत गावरानी गाई किंमत २,६०,००० /- व ४ नग जिवंत गोरे(बैल) किंमत २५,०००/- व ट्रक क्रमांक CG-04- JB-1573  किंमत २०,००,००० /-  असा एकूण २२,८५,०००/- माल मिळुन आले. सविस्तर  घटनास्थळ पंचनामा करून कारवाई करून ट्रक मधील जनावरे देखभाल व उपचार करिता श्रीकृष्ण भगवान गौरक्षण संस्था गोंडेगाव ता. नरखेड येथे जमा करण्यात आले व ट्रक पोलिस स्टेशनला जमा करण्यात आले .

सदर प्रकरणी ट्रक चालका विरुद्ध पो.स्टे. सावनेर येथे आरोपीविरुध्द कलम 11 (१) (घ)(ड)(च) प्राणि निर्दयतेने वागणुक प्रतिबंधक अधिनियम, सन १९६० , सह कलम  5(अ), 9  महराष्ट्र प्राणी स्वंरक्षण अधिनियम सन १९६५ सह्कलम ११९ मपोका.अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोउपनि.आशिषसिंग ठाकुर हे करीत आहे.

सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. विजयकुमार मगर, अपर पोलीस अधीक्षक श्री. राहुल माकणीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग श्री. अशोक सरंबळकर यांचे मार्गदर्षना खाली पोलीस स्टेशन सावनेरचे ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री. मारुती मुळूक यांचे नेतृत्वात सफौ अनिल तिवारी , पोलीस हवालदार दिनेश काकडे , पोलीस शिपाई रविन्द्र भलावी यांनी केली आहे.

-दिनेश दमाहे
9370868686
dineshdamahe86@gmail.com

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

बेघरांना हक्काचे घर मिळावे यासाठी भूखंड वाटप – सुनील केदार

Thu Dec 30 , 2021
-सावनेर येथे 67 तर कळमेश्वर 93 लाभार्थ्यांना भूखंड प्रमाणपत्राचे वितरण नागपूर : गरीब व बेघर गरजू कुटुंबांना हक्काचा निवारा मिळण्यासाठी सावनेर व कळमेश्वर तालुक्यातील 160 बेघरांना हक्काचे घर मिळावेत, यासाठी आज पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार याच्या हस्ते भूखंड प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. ‘सर्वांसाठी घरे’ महाआवास अभियान 2022 अंतर्गत सावनेर पंचायत समिती येथे तालुक्यातील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com