कामठी तालुक्यातील सहा ग्रामपंचायती झाल्या स्मार्ट

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- पंचायतराज व्यवस्थेमध्ये महत्वाचा घटक ह्या ग्रामपंचायती असतात.कामठी तालुक्यातील 47 ग्रामपंचायती च्या तुलनेत सहा ग्रामपंचायती ह्या स्मार्ट ग्रामपंचायती ठरल्या असून तसे शासनाच्या वतीने निवड करून जाहीर करीत पुरस्कारीत सुद्धा करण्यात आले आहे .या सहा स्मार्ट ग्रामपंचायती मध्ये कढोली,लिहिगाव,महालगाव,तरोडी, वडोदा,कापसी (बु)चा समावेश आहे.

शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम ग्रामपंचायती करतात त्यामुळे ग्रामपंचायती बळकट करण्यासाठी त्यांना जादा अधिकार देण्याचे प्रयत्न गत अनेक वर्षांपासून सुरू आहेत.त्यानुसार ग्रामपंचायतींना जादा अधिकार देण्याबरोबरच त्या ऑनलाईन म्हणजे हायटेक करण्याचाही शासनाचा प्रयत्न आहे. ग्रामपंचायती च्या वतीने देण्यात येणारे दाखले ऑनलाईन करण्यात आले तर सर्व ग्रामपंचायतींना महा ई ग्राम प्रणालीचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खुनाचे गुन्हयातील पाहिजे असलेल्या आरोपीस अटक

Thu Feb 29 , 2024
नागपूर :- फिर्यादी शेख अलताफ शेख जमील, वय ३८ वर्ष, रा. रामगड आनंद नगर, नविन कामठी, नागपूर हे परिवारासह घरी हजर असतांना आरोपी क. १) जहुर खान वल्द रहीम खान वय ६० वर्ष रा. बजराज नगर, जि झाडचोकडा, राज्य उडीसा व त्यांचे २१ साथिदार यांनी संगणमत करून गैर कायदयाची मंडळी जमवुन जुने भांडणाचे कारणावरून फिर्यादीचे कुटुंबावर शस्त्रानीशी हल्ला करून, शेख […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!