मुंबई :- मुंबई शहरात संसर्गजन्य साथीच्या आजारावरील उपचारासाठी सध्या कस्तुरबा रुग्णालय उपलब्ध आहे. वाढत्या रुग्णांचा ताण कमी करण्यासाठी नवीन रुग्णालयासाठी जागेचा शोध सुरू असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.
विधान परिषदेत सदस्य विलास पोतनीस यांनी अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून म.वि.प. नियम ९२ अन्वये प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री उदय सामंत म्हणाले की, ज्या ठिकाणी आरोग्य सुविधांचा अभाव आहे, तिथे आरोग्य सुविधा देण्याची आपली जबाबदारी आहे. त्यामुळे कस्तुरबा रुग्णालयासारखेच आणखी एका रुग्णालयाची गरज लक्षात घेऊन कार्यवाही सुरू आहे. जिथे जागा उपलब्ध असेल त्यापैकी योग्य जागेचा पर्याय शोधला जाईल.
या चर्चेत सदस्य सुनील शिंदे, सचिन अहिर, महादेव जानकर यांनी सहभाग घेतला.