– अजय कदम यांच्या नेतृत्वात अप्रतिम वास्तुची निर्मिती – टेकचंद सावरकर
-पाच दिवसीय प्राण प्रतिष्ठा महोत्सवाचे थाटात समारोप
कामठी:- कामठी शहरामध्ये कोणत्याही प्रकारचे भव्य दिव्य असे सभागृह उपलब्ध नसल्यामुळे लोकांना सांस्कृतिक कार्यक्रम घेणे शक्य नव्हते, कामठी शहरामध्ये अग्रवाल भवन शिवाय कोणताही सभागृह उपलब्ध नाही, अश्या परिस्थितीत कामठी शहरातील मध्यभागी श्री. निंबाजी अखाडा व्यायाम शाळेची निर्मिती अजय कदम यांच्या पुढाकाराने साकारण्यात आली. त्याकरिता गेल्या अनेक वर्षापासुन लोकांना अश्या वास्तुची प्रतिक्षा होती ती आता पुर्ण झाली असुन श्री. निंबाजी अखाडा व्यायाम शाळेची बहुमजली ईमारत निंबाजी अखाडा व्यायाम शाळेच्या स्वरूपात लोकार्पण करत असतांना अत्यंत आनंद होत आहे, तसेच भविष्यात लिंबाजी अस्वाडा व्यायाम शाळा ही कामठी शहरातील सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे केंद्र होणार असा विश्वास ॲड. सुलेखा कुंभारे यांनी व्यक्त केला.
कामठी शहरातील शाहिद भगतसिंग नगर स्थित निंबाजी अरवाडा व्यायाम शाळेच्या उद्घाटन दिनांक २८/०१/२०२५ रोजी सायंकाळी संपन्न झाले. या प्रसंगी ॲड. सुलेखा कुंभारे यांनी वरील आपल्या भावना व्यक्त केल्या, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार टेकचंद सावरकर होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला गोयल टॉकीज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला ॲड. सुलेखा कुंभारे, टेकचंद सावरकर,अजय कदम व निंबाजी अखाडा व्यायाम शाळा संस्थेच्या पदाधिका-यांच्या वतीने माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या ठिकाणावरून निंबाजी अखाडा व्यायाम शाळे पर्यंत पद यात्रा काढण्यात आली. या मध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचा विशेषतः महिलांचा मोठ्या संख्येनी सहभाग होता.
टेकचंद सावरकर यांनी निंबाजी अखाडा येथील हनुमाण मंदिरातील प्राण प्रतिष्ठा केलेल्या मुर्तीची पुजा अर्चणा केली व निंबाजी अखाडामधील हनुमान मंदिराचे उद्द्घाटन केले. उद्घाटक म्हणुन बोलत असतांना टेकचंद सावरकर यांनी निंबाजी अखाडा व्यायाम शाळेची अप्रतिम अशी ईमारत उभारल्या बद्दल अजय कदम व त्यांच्या सहका-यांचे अभिनंदन केले. ते पुढे म्हणालेत की, या अप्रतिम वास्तुच्या सौदर्थीकरण करण्याकरिता आमदार असतांना निधी उपलब्ध करून दिली व माझा सुध्दा या वास्तु निर्मिती मध्ये थोडया प्रमाणात का होईना योगदान असल्याचे आनंद आहे महसुल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहु शकले नाही या बाबत टेकचंद सावरकर यांनी दिलगीरी व्यक्त केली.
श्री. निंबाजी वस्ताद अखाडा व्यायाम शाळा संस्था, श्री. निंबाजी सामाजिक कौशल्य विकास संस्था,श्री निंबाजी अस्वाडा हनुमान मंदिर च्या संयुक्त विद्यमाने दिनांक २४/०१/२०२५ ते दिनांक २८/०१/२०२५ पर्यंत पाच दिवसीय प्राण प्रतिष्ठा महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे अध्यक्ष अजय कदम, यांनी केले होते. या पाच दिवसीय कार्यक्रमाच्या अंतर्गत पुजा, पार्थना ग्रह हवन आरती प्राण प्रतिष्ठा मुर्तीची शोभा यात्रा १०८ कलशांसह अभिषेक महास्नान व्यासाविधी मुर्ती अभिषेक दसादिकपाल ईत्यादी धार्मित विधी संपन्न झाली त्या मध्ये मोठ्या प्रमाणत कामठी शहरातील लोकांनी विशेषतः महिलांनी सक्रिय भाग घेतला.
या प्राण प्रतिष्ठा महोत्सव व उद्द्घाटन कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता रामेश्वर बावनकर, अरविंद बावनकर, दिपक सिरीया, राजेश शर्मा, श्रीकांत शेंद्र, पराग अहिरकर, विशाल गभणे, शैलेश भुजाडे, शुध्दोधन पाटील, संजय केसरवाणी, चरण चावला, महेश शर्मा, नरेश दवानी, नारायण शर्मा, तोत्याभाऊ महाजन, अशोक बागडीया, पुरुषोत्तम अतकर, निलेश गभणे, आदर्श तरारे, हितेश बावनकुळे, मुन्ना झलपुरे, आकाश तरारे, प्रकाश ईटनकर, लक्ष्मीकांत बोंडे, विवके गभणे, दिपक धुर्वे, राजु बागडकर, शेखर येरपुडे, चिंटु अहिरकर, अमोल पाटील, अतुल ईटनकर, श्रीनिवास ढोके, विकास टेंभुर्णे, अमित मेश्राम, अमोल विधे, उदय गुप्ता, सुमीत फटींग, राजु शर्मा, राकेश बागडकर, जहीर नक्काश, शेख कासीम, अनिस कुरेशी, दिपेश पंडीत, वैशाली कदम, सुनिता ईटनकर, मंजु अहिरकर, स्वरा सोनटक्के, आराधना पारसे, शोभा लटीया, मंदा अवचट, निमिला इटनकर, कुसुम इटनकर, नलिनी झेलपुरे, भारती ठोगसे, कलावती धुरई, सुचिता चांबट, प्रिती वाघमारे, स्वाती इटनकर, प्रमिला बागडकर, शितल बागडकर, अश्विनी आकरे, वर्षा बावनकुळे, दिक्षा बोंडे, दुर्गा बोंडे, बेबी बोडें, दिपाली तरारे, कोमल तरारे, पल्लवी तरारे, पूजा गभणे, नेहा पाटील, अश्विनी आकरे, नेहा पाटील, नम्रता भुजाडे, तृप्ती इटनकर, सुप्रिया धुर्वे, रूपाली गभणे ईत्यादींनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन ज्योती भगत यांनी केले तर आभार मंगेश गोमकर यांनी मानले.