‘जय श्रीराम’ च्या गजरात श्रीराम दर्शन रथाचे भाजपा प्रदेश कार्यालयात जल्लोषात स्वागत

मुंबई :- अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती असलेल्या श्रीराम दर्शन रथाचे भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात मंगळवारी ‘जय श्रीराम’ घोषणांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी, प्रदेश प्रवक्ते अतुल शाह, विनोद वाघ, ओमप्रकाश चौहान, देवांग दवे, कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी, आदि यावेळी उपस्थित होते. अयोध्येच्या राम मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या भव्यदिव्य प्रतिष्ठापना सोहळ्याचे विधी मंगळवार पासून सुरू झाले आहेत.सर्वांनाच प्रत्यक्ष जाऊन प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेणे आणि मंदिर पाहता येणे शक्य नाही हे लक्षात घेऊन अयोध्येतील राम मंदिर कसे आहे हे पाहता यावे यासाठी श्वेता शालिनी यांच्या संकल्पनेतून हा श्रीराम दर्शन रथ साकारला आहे.

अयोध्येहून आलेल्या कारागीरांनी या रथावर मंदिराची प्रतिकृती उभारली असून प्रभू श्रीरामाची सुंदर मूर्ती ठेवण्यात आली आहे. हा दर्शन रथ महानगरामधील गृहसंकुलांमध्ये जाणार आहे. रथावरील राम मंदिराच्या प्रतिकृतीच्या माध्यमातून अयोध्या येथे येत्या 22 तारखेला लोकार्पण होणा-या मंदिराची माहिती व अयोध्या येथील श्रीरामाच्या दरबाराचे दर्शन घेता येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सारथी संस्थेकडून विविध स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज आमंत्रित

Wed Jan 17 , 2024
नागपूर :- छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण व मानव विकास संस्था मार्फत ल‍क्षित गटातील विद्यार्थ्यांकरिता २०२४ -२०२५ करीता विविध स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. सारथी या संस्थेकडून मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या लक्षित गटाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी नियोजन विभागाच्या अधिपत्याखाली स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेमार्फत लक्षित गटातीला विद्यार्थ्यांना महत्वाच्या परीक्षेसाठी प्रशिक्षण, विद्यावेतन व आर्थिक सहाय्य करण्यात येते. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com