संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-सदभावना ग्रुप मित्र परिवारातील युवकांची मागणी
कामठी ता प्र 30:-गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनांमार्फत शिवभोजन योजना आखण्यात आली असून या शिवभोजन योजनेचा लाभ दुपारी घेतल्यानंतर रात्रीच्या जेवणाचो कोणतीही सोय नसते ज्यामुळे अनेक गरजू व गरीब नागरिक रात्रीला उपाशीपोटो झोपत आहेत.करिता कामठी शहरातील सुरू असलेल्या शिवभोजन केंद्रावर सायंकाळी सुदधा शिवभोजन थाळी चो सोय करून द्यावी अशी मागणी सदभावना ग्रुप कामठी च्या मित्र परिवारच्या वतीने करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मजूर, स्थलांतरीत, बेघर तसेच बाहेरगावचे इत्यादी लोकांचे जेवणाअभावी हाल अपेष्टा होत होत्या त्यावेळी त्या सर्वांना शिवभोजन थाळीने सहारा दिला. कोरोना काळात नागरिकांचे हाल होऊ नये यासाठी शासनाने शिवभोजन थाळी मोफत उपलब्ध करून दिली होतो.त्यावेळी अनेकांनी या थाळीचा लाभ घेतला. आता जरी एका थाळीमागे शासनाच्या वतीने दहा रुपये शुल्क आकारत असले तरी शहरासह ग्रामीण भागातील नेरी, गादा, गुमथळा, आदी ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरीकाना या शिवथाळीचा लाभ होतो .या योजने अंतर्गत सकाळी 11 ते 4 यावेळेत ही थाळी उपलब्ध करून दिली जात असली तरी दुपारच्या वेळी जेवनाचा लाभ घेतल्या नंतर रात्रीच्या जेवणाची कोणतीही सोय नसल्याने अनेक गरजू व गरीब लोकं उपाशी झोपत आहेत.तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागातील मजूर, बेघर, गरजू व गरीब लोकांची उपासमार होऊ नये तसेच त्यांची सायंकाळच्या जेवणाची सोय व्हावी यासाठी सायंकाळच्या सुमारास शिवभोजन केंद्रावर शिवभोजन थाळी ची व्यवस्था सुरू करण्यात यावी अशी मागणी सदभावना ग्रुप कामठी चे सुनील बडोले, प्रमोद खोब्रागडे, प्राध्यापक फिरोज हैदरी, ऍड पंकज यादव, नरेश फुलझेले, अविनाश भांगे, नागसेन गजभिये, सुनील चहांदे,राकेश कनोजिया, अजय करियार, यासिन भाई, सलीम भाई,सज्जाक शेख, रंगारी,प्रमोद रंगारी, आसाराम हलमारे, तसेंच आशिष मेश्राम, गीतेश सुखदेवें, आदींनी केली आहे.
–प्रमोद उर्फ गुड्डू मांनवटकर, माजी नगराध्यक्ष नगर परिषद कामठी
–जर सायंकाळी अथवा रात्रीच्या सुमारास शिवभोजन थाळी सुरू झाली तर याचा लाभ गरजू लोकांना होईल .यामुळे शिवभोजन थाळीच्या लाभार्थ्यांची संख्याहो वाढेल व अप्रत्यक्षरीत्या या योजनेची व्याप्तीही वाढेल याचा सर्वाधिक लाभ जे विद्यार्थी जेवणासाठी रात्रीची मेस लावतात त्यांना विशेषता होईल कारण कसेबसे शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना घरच्या जेवणाची सोय मिळत नसल्याने नाईलाजास्तव मेस लावावी लागते परंतु जर शिवभोजन थाळी रात्री उपलब्ध झाली तर त्यांना मेस लावण्याची आवश्यकता पडणार नाही .
बॉक्स-सिद्धार्थ रंगारी माजी नगरसेवक , नगर परिषद कामठी
सायंकाळच्या जेवणाची व्यवस्था व्हावी…
-आजही अनेक गरजू शिवभोजन थाळीच्या भरवश्यावर पोटाची भूक भागवत असतात परंतु सायंकाळच्या सुमारास अशा प्रकारची कुठलीहो योजना उपलब्ध नसल्याने गरजू व्यक्तींना शिवभोजन थाळीचा लाभ घेता येत नाही याकरिता शासनाने सायंकाळच्या सुमारास शिवभोजन केंद्र सुरू ठेवावे जेणेकरून गरजू व गरीब लोकांच्या सायंकाळच्या जेवणाची व्यवस्था होईल व त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न मिटेल…
सायंकाळी उपलब्ध करून द्यावी शिवभोजन थाळी
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com