कोराडी :- ग्रा, पं सदस्य तथा उबाठा(शिवसेना)कामठी ग्रामीणचे युवा अविनाश भोयर यांनी रविवारला प्रदेशाध्यक्ष भाजपा, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात दाखल होऊन असंख्य शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश घेतला. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पार्टीचा गमचा आणी पेढे भरवून सगल्याचे सहर्ष स्वागत केले.
त्यामुळे आता कामठी तालुक्यात उबाठा पुर्णतः खिलखिली झालेली आहे, सर्व कार्यकर्तयानां सन्मानजनक वागणूक मिळेल, भाजपामध्ये परीवार वादाला स्थान नाही सर्व निर्णय मेरीट वर आधारीत असतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला प्रगतीचे, सम्रुध्दीचे व्हीजन दिले आहेत, जगात 3 र्याक्रमांकाची शक्ती भारत झाला आहे, आपल्याला भाजपा सरकार, मोदी यांच्या गरीब कल्याणाच्या योजना, सर्व स्तरातील शेवटच्या माणसाला द्यायच्या आहेत, असेही यावेळी बावनकुळे संबोधनातून मत व्यक्त केले.
भाजप प्रवेश घेणारे अविनाश भोयर सह अनिल सोनटक्के, वैभव चौधरी, अमोल जाधव, देवानंद सावरकर ,हर्षल बागडे, हिरेंद उबाले, विनोद मुसळे धनंजय डेनेकर, समीर सिल्लोरे, शुभम पांडे, सुधीर भोयर, निखील नेवारे, राहुल रहांगडाले, रोशन खाडे, मंगेश चटप, पंकज झोड, ,मनोज मालकर, प्रवीण जांगडे रोशन येलेकर शुभम दीक्षित, प्रविणनिंबालकर, कुणाल पट्टेमवार नितीन बुकणे, दिनेश पंडेल, अनमोल मेश्राम, ऋषिकेश खसारे, आकाश बालबुधे, आसु बालबुधे सह असंख्य शिवसैनिक भाजप विलीन झालेत.