ह्रद्ध सत्काराने भारावले व्हाईस ऑफ मीडियाचे शिलेदार ! 

– मान्यवरांनी सांगितली संघटनेच्या यशस्वीतेची पंचसूत्री

– पुण्यात रंगला ‘व्हाईस ऑफ मीडिया’चा कार्यक्रम  

पुणे :- बारामती येथे 18 आणि 19 डिसेंबरला झालेल्या पत्रकार शिखर अधिवेशनामध्ये यशस्वीतेचे शिलेदार असलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा, कोरटीमचा ‘व्हाईस ऑफ मीडिया’च्या वतीने पुण्यात ह्द्य सत्कार करण्यात आला. एखाद्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झटणाऱ्यांचा सत्कार हा अत्यंत भावनिक कार्यक्रम असून पुढील सत्कार्यासाठी ती संजीवनी असते अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या.

पुण्यातील पुनवळे भागात लोटस बिझनेस स्कूलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यातील यशस्वी सामाजिक कार्यकर्ते व संस्थाचालक भाऊसाहेब जाधव होते. तर यावेळी विचारपिठावर ‘व्हाईस ऑफ मीडिया’चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, ‘व्हाईस ऑफ मीडिया’चे प्रदेश उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ , ‘व्हाईस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय आवटे, लोटस बिजनेस स्कूलचे संचालक डॉ. सतीश वरफडे, सामाजिक कार्यकर्ते विलास किरोते, डॉ. प्रमोद दस्तुरकर, यशदाचे अधिकारी बबन जोगदंड आदी, गजानन मोरे आदि यावेळी उपस्थित होते.

संघटनेचे यशस्वीतेचे गमक सांगताना भाऊसाहेब जाधव म्हणाले, संघटना कोणत्याही एकट्या दुसऱ्याची असू शकत नाही. सामूहिक जबाबदारी घेऊन केलेल्या कामामुळे ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ने अल्पावधीत केलेली प्रगती ही संघटनेच्या प्रत्येकाच्या योगदानाची पावती आहे. हा तुमच्या कार्याचा सत्कार असून अशा सत्कारामुळे सत्कार्याला संजीवनी मिळते. पत्रकारांच्या पालकांच्या शिक्षणासाठी काही अडचणी असतील तर आपल्याला त्या विनम्रपणे दूर करण्यात आनंद होईल. त्यामुळे पत्रकारांनी नि:संकोच पणे आपली मदत घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

एखादी संघटना यशस्वी होण्यासाठी मनापासून असलेली कळकळ, लोकांना एकत्र करण्याची कला, त्यांच्यातील गुण ओळखून त्यांच्यावर योग्य ती जबाबदारी देऊन काम करून घेणे व संघटनेचे चारित्र्य निःसंदिग्ध ठेवणे. ही पंचसूत्री असल्याचे ज्येष्ठ संपादक संजय आवटे यांनी यावेळी सांगितले. संघटनेमध्ये कोणीही निरुपयोगी नसतो. प्रत्येकांमधील गुण हेरून त्याला जबाबदारी द्यावी लागते व संदीप काळे हे व्यक्तिमत्व अशाच गुणसंपन्न पदाधिकाऱ्यांच्या बळावर संघटनेला आकार देत आहेत. तसेच संघटनेमध्ये कोणीही सर्व गुण संपन्न नसतो की ज्याच्यावर अवलंबून राहावे लागेल. अलीकडच्या काळात तोडण्याची स्पर्धा लागलेली आहे. अशा काळात व्हाईस ऑफ मीडियाने जोडण्याची भूमिका घेतली ही निश्चितच कौतुवास्पद व गौरवपूर्ण बाब असल्याचेही आवटे म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी या सत्काराच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करून, बारामती अधिवेशन यशस्वी करण्यासाठी झटलेल्या शिलेदारांचा गौरव करून या सत्कारामुळे त्यांना पुढे काम करण्यासाठी नवी उमेद मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी सन्मान करण्यात आलेल्या सदस्य संदीप महाजन, चेतन कात्रे, अरुण ठोंबरे, सुरेश जगताप, यास्मिन शेख यांनी आपल्या भावना व्यक्त करून संघटनेच्या कामासाठी आपण यापुढेही पूर्ण ताकदीनिशी योगदान देणार असल्याचे सांगितले. ‘व्हाईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी आगामी काळात राज्यात उभे राहणाऱ्या प्रोजेक्ट विषयी माहिती दिली.

मान्यवरांच्या हस्ते सर्व कोर टीम मान्यवरांचा शिलेदारांचा यथोचित गौरव करण्यात आला. प्रमोद दस्तुरकर यांनी आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आमदार प्रवीण दटके यांच्या हस्ते गांधीबाग झोनच्या 'विकसित भारत संकल्प यात्रा' शिबिराचे उद्घाटन

Tue Dec 5 , 2023
– शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  नागपूर :- केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने देश पातळीवर सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेअंतर्गत सोमवार (ता४) रोजी गांधीबाग झोन येथील गाड़ीखाना शाळा मैदान आणि साने गुरुजी शाळा मैदान येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन आमदार प्रवीण दटके यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्र आणि राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!