महाविकास आघाडीत प्रसिद्धी पासून दूर राहून सर्वात कमी आवाज करीत सर्वात योग्य निवडक उमेदवार देणारा एक दबंग नेता कुणी असेल तर ते शरदचंद्र पवार …..!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे उमेदवार जाहीर झाले आहेत, त्यांचे मतदार संघ आणि तेथील राजकीय गणित पाहिले तर यंदाचे विधानसभेत सर्वात जास्त यशस्वी कुणी ठरणार असेल तर ते शरदचंद्र पवार हे आजच दिसून येत आहेत. फक्त ८२ जागा लढवून सुप्रिया सुळे किंवा आपल्या भरवशाच्या शिलेदाराला मुख्यमंत्री पदी बसविण्याचे गणित शरदचंद्र पवार यांनी साधले आहे !
जास्त लोड न घेता, यश कसे पदरी पाडता येईल ही किमया या निवडणुकीत त्यांनी दाखविण्याची पुन्हा एकदा व्युव्ह रचना आखली आहे, हे त्यांचे ८२ विधानसभा क्षेत्र आणि लढवय्ये शिलेदार फिट करण्यावरून दिसून येते !
निवडणुक निकाल जाहीर होताच २४ नोव्हेंबर २०२४ नंतर राज्यातील सत्तेचे केन्द्र “सिल्व्हर ओक” हे पवारांचे निवासस्थान च असेल हे सर्वांना आजच लक्षात येईल , अशी स्थिती निर्माण झाली आहे !
– बॅरि. विनोद तिवारी / नागपूर
राजकीय विश्लेषक आणि प्रसिद्ध विधीज्ञ