शेतात चिखल करताना ट्रॅक्टर पलटल्याने चालकाचा जागीच मृत्यू ; मेहदीपुर येथील घटना

अमरदिप बडगे , प्रतिनिधी 

गोंदिया – जिल्हात सध्या पाऊसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाला वेग आला असून शेतकरी शेतात मशागत कामे करून रोवणीचे कामे सुरू केली असातच काल सायंकाळी 5 वाजे दरम्यान गावातील मडावी यांच्या शेतात ट्रक्टरने शेतात चिखल करित असताना अचानक ट्रॅक्टर पलटल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तिरोडा तालुक्यातील मेंहदीपुर येथे घडली आहे.

मृतकाचे नाव विशाल बिसेन वय 26 वर्षे असुन मेंहदीपुर येथील रहिवासी आहे. स्वताचा ट्रॅक्टर ने तो गावातील मडावी यांच्या शेतात चिखल करून देत असल्याचे सांगितले जात आहे. शेतात चिखल करताना ट्रॅक्टर पलटल्याने विशालचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे . विशालचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करिता उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे पाठविण्यात आले असून पुढील तपास  तिरोडा पोलिस करीत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अमली पदार्थ विरोधी पथकाची नागपुरात मोठी कारवाई

Mon Jul 11 , 2022
– एकूण 2665000/- रु मेफेड्रोन ( mephedron) ड्रग्स सह मुद्देमाल जप्त.. नागपूर – अंमली पदार्थ विरोधी पथकाने नागपुरात मोठी कारवाई केली आहे. आज करण्यात आलेल्या कारवाईत 250 ग्राम मेफेड्रोन ( mephedron) ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अंदाजे 25 लाख इतकी किंमत असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर आरोपीतांकडून चार मोबाईल जप्त करण्यात आलेले आहे. यामध्ये तीन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com