बांधकाम साहित्य उघड्यावर टाकल्याने १० हजार रुपयांचा दंड वसुल

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने रस्त्यावर बांधकाम साहीत्य ठेवणाऱ्या कृष्णा देवर्षी पॅलेसचे राजेंद्र गुंडांवर यांच्याकडुन ५ हजार व व विनय कुमार जैन यांच्याकडुन ५ हजार असा एकुण १० हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे. संबंधीतांकडुन दंड वसुल करून पुन्हा सदर कृती न करण्याची ताकीद सुद्धा देण्यात आली आहे.

यापुर्वीही अश्या प्रकारची दंडात्मक कारवाई चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे व विभागामार्फत सातत्याने उपद्रवी घटकांवर नजर ठेवण्यात येते. मात्र या घटनांची पुनरावृत्ती बघता स्वच्छतेप्रती आपली मानसिकता बदलण्याची गरज निश्चितच वाटते. स्वच्छता ही स्वच्छता कर्मचाऱ्यांइतकीच आपलीही जबाबदारी आहे याचे भान ठेवणे आवश्यक आहेत. दंड ठोठावणे नाही तर स्वच्छतेचे पालन व्हावे हा यामागचा हेतू आहे.

स्वच्छता विभागामार्फत दररोज सकाळ संध्याकाळ झडाई करून शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला जातो मात्र काही उपद्रवी तत्वांद्वारे सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणे, सार्वजनिक ठिकाणी बांधकाम साहित्य ठेवणे हे प्रकार केले जातात. स्वच्छतेची सवय लावुन महानगरपालिकेच्या प्रयत्नांना योग्य तो सहयोग करण्याचे चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

NewsToday24x7

Next Post

खासदार सुनिल मेंढे यांच्या ताफ्यातील वाहनाला ट्रक ने दिली धडक

Mon May 22 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  भंडारा :- खासदार सुनील मेंढे यांच्या ताफ्यातील वाहनाला ट्रकने दिलेल्या धडकेत वाहनाचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने या अपघातात अन्य नुकसान झाले नाही. खासदार सुनील मेंढे दिव्यांग साहित्य वाटप शिबिराला व जनता दरबाराला उपस्थित राहण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव कडे निघाले होते. वैनगंगा नदीवरील पुलाच्या दिशेने जात असताना महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती याच वाहतूक कोंडी […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com