नागपूर :- शहरात वाढत्या कॉंक्रिटीकरमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झालेला आहे. अशा वेळेस वृक्षारोपणाची मोहीम विविध संघटनांच्या माध्यमातून विविध स्तरावर विविध व्यक्ती राबवित आहेत. अशीच मोहीम बसपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते उत्तम शेवडे यांनी मागील अनेक वर्षापासून स्वतःच्या वस्तीपासून पुढाकार घेऊन राबविली आहे.
त्यांनी स्वतःच्या वसाहतीत लावलेले वृक्ष आता दौलदार झालेले असून अनेकांना सावली देत आहेत. पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर वृक्षारोपण केलेच पाहिजे प्रत्येकानी जीवनात एक तरी वृक्ष लावला व जगवला पाहिजे. पिंपळवृक्ष (बोधीवृक्ष) हा 24 तास ऑक्सिजन देणारा असल्याने शेवडे यांनी त्या वृक्षावर जास्त भर दिलेला आहे.