– पोलीस उपायुक्त , गजानन राजमाने यांनी 15 गोरकुनांना प्रशंसापत्रे देवून त्यांचा सत्कार केला.
नागपुर – मुस्लिम बांधवाचा शब-ऐ-बारात हा सण सगळीकडे साजरा झाला. नागपूर मधील करकज मजलीस मुस्लिम कब्रस्तान, मोमीनपुरा येथे या निमित्ताने सुमारे एक लाख मुस्लिम नागरीकांनी आपले पुर्वजांचे कबरीवर नमाज पठण केले. सदर वेळी पोलीस उपायुक्त, परिमंडळ 3 यांच मार्गदर्शनाने चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. या सणा दरम्यान मुस्लिम समाजातील नेते, मशीदीचे इमाम, मौलाना,शांतता कमिटी चे सदस्य यांच्या उपस्थितीत पोलीस विभागामार्फत मोमीनपुरा कब्रस्तान येथे गोरकून(कबर बनाने वाले) म्हणून गेली अनेक वर्शा पासुन अहोरात्र काम करीत असलेल्या तसेच त्यांनी कोराना माहामारीचे काळात सुध्दा मयत झालेल्या रूग्णांचा कोणताही भेदभाव न राखता त्यांच्या मृत शरीराचा दफन विधी करण्याचे पवि़त्र काम केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक म्हणून पोलीस उपायुक्त, परीमंडळ क्र. 3 नागपूर शहर यांनी एकून 15 गोरकुनांना (कबर बनाने वाले) प्रशंसापत्रे देवून त्यांचा सत्कार केला. मुस्लिम बांधवांनी पोलिसांना सहकार्य करत शब-ऐ-बारात सण शांततेत पार पाडला आहे.
सदरचा शब-ऐ-बारात बंदोबस्त नविनचंद्र रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त, उत्तर विभाग नागपूर शहर, गजानन शिवलिंग राजमाने, पोलीस उपायुक्त , परिमंडळ 3,नागपूर शहर, संजय बर्वे, सहा. पोलीस आयुक्त, कोतवाली विभाग, नागपूर शहर, यांचे मार्गदर्शनात तृप्ती सोनवणे, वरिश्ठ पोलीस निरीक्षक, पो.स्टे. तहसिल, नागपूर शहर यांनी योग्य रित्या शांततेत पार पाडला आहे