संदीप कांबळे , विशेष प्रतिनिधी
कामठी :- येथील रमाई नगरात गंभीर पाणी समस्या निर्माण झाली असून पाण्यासाठी भाजप च्या वतीने कामठी नगर परिषद कार्यालयासमोर प्रशासनाविरोधात तीव्र नारेबाजी करून थाली नाद आंदोलन करण्यात आले. नगरपरिषद प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कामठी नगर परिषद प्रभाग क्रमांक 15 रेल्वे लाईन जवळ नवीन कामठी येथे 60 ते 70 कुटुंब वास्तव्यास असून या परिसरात नगर परिषदेच्या वतीने पाणी पाईपलाईन नसल्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते, पाणी समस्येसाठी नागरिकांनी माजी नगरसेविका संध्या रायबोले,कामठी शहर भाजपचे माजी महामंत्री उज्वल रायबोले यांच्या नेतृत्वात अनेकदा निवेदन मुख्याधिकारी,नगरपरिषद प्रशासन, तहसीलदार, महसूल विभागीय अधिकारी यांना दिली परंतु प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही, यापुर्वी काही दिवस अगोदर नगर परिषद कार्यालय समोर माठ फोड़ो आंदोलन करण्यात आले पण न प प्रशासन कुंभकरनी झोपेत आहे न प द्वारा नेहमीच निवेदनाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. आता उन्हाळ्याला सुरुवात झाली असून नागरिकांना पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे,
रमाई नगरातील पाणी समस्येसाठी भाजपचे वतीने आज थाली नाद आंदोलन करण्यात आले होते. कामठी नगर परिषद कार्यालयासमोर भाजपचे माजी महामंत्री उज्वल रायबोले, माजी नगरसेवक प्रतिक पडोळे यांच्या नेतृत्वात थाली नाद आंदोलन करून बहिऱ्या प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले, नप प्रशासक/मुख्याधिकारी संदीप बोरकर कार्यालयात असूनही त्यांनी निवेदन स्विकारले नाही, त्यामुळे निवेदन नप च्या आवक विभागात देऊन पोच घेण्यात आली.निवेदना ची प्रत भाजपा प्रदेश अध्यक्ष विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांना सुद्धा पाठविण्यात आली.
थाली नाद आंदोलनात रमाई नगरातील शंकर चवरे, ऋषि दहाट,संघरक्षित साखरे,अनिकेत शेंडे,ललिता सडमाके, शारदा भगत, सुनिता रंगारी यांनी भाग घेतला.पाणी समस्येसाठी नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात तीव्र नारे निदर्शने करून थाली नाद आंदोलन केले आठ दिवसाच्या आत रमाई नगरातील पाणी समस्या न सोडविल्यास मुख्याधिकारी/प्रशासक यांना साडी, चोळी व बांगड्याच्या आहेर देण्यात येईल असे भाजपचे माजी महामंत्री उज्वल रायबोले यांनी सांगितले आहे.