संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– सण उत्सव शांततेत आनंदाने साजरे करा पोलीसांचे नागरिकांना आवाहन.
कन्हान :- शहरात आणि ग्रामिण भागात सण उत्सव दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडु नये व शांतता, सुव्यवस्था कायम राहावी या उद्देशाने कन्हान पोलीसां नी शहरात रुट मार्च काढुन सण उत्सव शांततेत आनंदाने साजरे करण्याचे आवाहन पोलीसांनी नागरिकांना केले आहे.
सायंकाळी ५ वाजता ते ७ वाजे पर्यंत कन्हान पोलीस स्टेशन हद्दीत उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक भटकर, पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते यांचा मार्गदर्शनात आगामी गणेशोत्सव, ईद ए मिलाद आदी सण उत्सवा दरम्यान शहरात आणि ग्रामिण भागात कायदा, सुव्यवस्था अबाधित रहावा म्हणुन कन्हान पोलीसांनी शहरात रुट मार्च काढला. हा रुट मार्च गांधी चौक, मटन-मच्छी मार्केट, पटेल नगर, पिपरी वरून आंबेडकर चौक ते राष्ट्रीय महामार्गाने तारसा रोड चौक, सात नंबर नाका, कांद्री, टेकाडी बस स्टाप येथुन परत राष्ट्रीय महामार्गा ने भ्रमण करीत रुट मार्च चे पोलीस स्टेशन येथे समापन करण्यात आले. याप्रसंगी कन्हान पोलीस स्टेशन गुन्हे पोलीस निरिक्षक यशवंत कदम, सपोनि चेतन चौहान, सपोनि राजेश जोशी, सपोनि पराग फुलझेले, पोउपनि सिमा बेंद्रे, पोउपनि शालिकराम महाजन (खुपीया) यांचा सह २२ पोलीस अमलदार, १८ एस.आर.पी.एफ.अमलदार, आर.सी. पी.पथक आणि २० होमगार्ड उपस्थित होते.