संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 21:-कामठी शहरातील सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसीय शिबिराचे घोरपड येथे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र बागडे अध्यक्ष स्थानी तर पंचायत समिती कामठीचे सभापती उमेश रडके आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अनीलजी निदान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. घोरपड गावच्या प्रथम नागरिक व सरपंच सौ ताराबाई कडू, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विनय चव्हाण व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विनोद शेंडे सुद्धा याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला माल्यारपण केले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. विनोद शेंडे यांनी त्यांच्या प्रास्ताविक भाषणात या सात दिवसीय शिबिराचे उद्दीष्ट स्पष्ट करत सात दिवसाच्या विविध उपक्रमांची रूपरेषा मांडली. माजी जिल्हा परिषद सदस्य अनिलजी निदान यांनी त्यांच्या भाषणात विद्यार्थ्यांनी देशसेवेसाठी सदैव तत्पर असायला हवे असे सांगितले. कामठी पंचायत समितीचे सभापती उमेश रडके यांनी विद्यार्थ्यांना कठीण परिश्रम करून प्रशासकीय सेवेत आपले योगदान देण्याचे आवाहन केले. आपल्या अध्यक्षीय संबोधनात प्राचार्य डॉ. महेंद्र बागडे यांनी शिबिराला उपस्थित विद्यार्थ्यांना या सात दिवसात सेवाभाव व व्यक्तिमत्त्व विकासाचे विविध धडे शिकण्यास आवाहन केले तसेच गावकरी व ग्रामपंचायात घोरपड च्या समस्त पदाधिकाऱ्यांचे त्यांच्या सहकार्याबददल आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. स्वप्नील दाहात, डॉ. सिद्धार्थ मेश्राम, डॉ निशिता अंबाडे, प्राध्यापक राजेश पराते, डॉ. किशोर ढोले, डॉ मंजिरी नगमोते, श्याम उंचेकर, कुणाल कडू सह गावकरी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महेश जोगी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. दिपक भवसागर यानी मानले.