महिला कांग्रेस स्थापना दिवस निमित्याने डॅाक्टर व परिचारिकांना सेवा गौरव पुरस्कार 

नागपूर :- अखिल भारतीय महिला काँग्रेसची स्थापना १५ सप्टेंबर १९८४ रोजी झाली. १५ सप्टेंबर १९८४ मध्ये भारताची पहिल्या महिला प्रधानमंत्री, भारतरत्न, शहीद इंदिराजी गांधी यांनी महिला कांग्रेसची स्थापना केली आणि आज महिला कांग्रेस स्थापनाचे ४० वर्ष पुर्ण करीत आहोत. या महिला काँग्रेसचा उद्देश सेवा, धर्य व स्वाभिमान हे आहेत. धर्मनिरपेक्ष, लोकतांत्रिक, न्यायपूर्ण कार्य या अमूल्यांचे समर्थनासाठी महिलांनी महिला काँग्रेसचे सदस्य झाले पाहीजेत.काँग्रेसच्या माध्यमातून महिलांचे सशक्तीकरण करण्याचे कार्य होत असतांना राजकीय व सामाजिक क्षेत्रात महिलांना आरक्षण मिळावे हे धोरण आहेअसे शहर महिला कॅाग्रेस अध्यक्ष ॲड. नंदा पराते यांनी प्रतिपादन केले.

नागपूर शहर महिला काँग्रेसच्या माध्यमातून महिला काँग्रेस स्थापना दिवस हा कार्यक्रम नागपूरात गांधीबाग येथील डागा शासकीय हॅास्पीटलमध्ये घेण्यात आला. या हॉस्पिटलातील निष्ठापूर्वक वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॅाक्टर व परिचारिकांच्या कार्यांची दखल घेवून त्यांना सेवा गौरव पुरस्कार महिला काँग्रेसकडून देण्यात आले.

या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून डॅा.दिलीप मडावी ,डॅा. नसिम अख्तर ,अनिल आदमने, प्रविण मदनकर,नफिसा अहमद, पुष्पलता पाटील हे मंचावर उपस्थित होते. डागा शासकीय हॅास्पीटल, गांधीबाग, नागपूर येथील डॅाक्टर व परिचारिकांना नागपूर शहर महिला कॅाग्रेस अध्यक्ष ॲड. नंदा पराते व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

महिला कांग्रेसची नवी वेबसाइट ४० व्या स्थापना दिवसाच्या निमित्याने सुरु झाली आहे. महिला कांग्रेसच्या वेबसाइट माध्यमाने पहिल्यांदा ऑनलाइन “सदस्यता अभियान” ची सुरूवात करण्यात आली आहे. नागपूर शहरातील महिला कॅाग्रेसचे पदाधिकारी, महिला कार्यकर्ते, सामाजिक महिला आणि प्रत्येक वर्गातील महिलांना आता रु. १०० मध्ये ५ वर्षासाठी महिला कांग्रेसचे सदस्य ऑनलाईन होता येते आणि प्रत्यक्ष महिला संघटनाशी ती महिला जोडली जाणार आहे.सर्व महिलांनी अखिल भारतीय महिला कांग्रेसचे सदस्य होण्यासाठी https://join.aimc.in वर आजच आपली ॲानलाईन सदस्य नोंदणी करावी असे आवाहन नागपूर शहर महिला कॅाग्रेस अध्यक्ष ॲड. नंदा पराते यांनी नागपुरातील सर्व महिलांना केले. 

नागपूर येथे काँग्रेस स्थापना दिवसाच्या निमित्ताने डॅाक्टर व परिचारिकांना सेवा गौरव पुरस्कार नागपूर शहर महिला कॅाग्रेस अध्यक्ष ॲड. नंदा पराते यांनी कार्यक्रमातून दिले. मेट्रान पुष्पलता पाटील, आशा मेटांगे,ललिता मेश्राम, डॅा. प्रिती भोयर,स्मिता गजभिये,डॅा. हेमलता मडावी, डॅा.जयश्री शंभरकर,डॅा.सोनाली बनसोड,डॅा. रूतुजा बरडे,डॅा. ज्योती मुखी, डॅा. स्मिता कायंदे,डॅा. शितल भानारे, डॅा. लिना कोवे, डॅा. विनिता जैन,डॅा. माधुरी थोरात,डॅा. सुलभा मुल यासह डॅाक्टर व परिचारिकांना सेवा गौरव पुरस्कार देऊन महिला कॅाग्रेस स्थापना दिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी घेतले गणरायांचे दर्शन

Sun Sep 15 , 2024
मुंबई :- राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथील श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि पूजन केले. याप्रसंगी राज्यपालांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ‘शासन आपल्या दारी’ या पुस्तकाची प्रत व श्री गणेशाची मूर्ती भेट म्हणून राज्यपालांना दिली. Follow […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com