हॉकी सीनिअर पुरूष : ध्यानंचद संघाला विजेतेपद

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील हॉकी स्पर्धेत अंतिम फेरीत सीनिअर महिला गटात रायझिंग फाउंडेशनने आणि सीनिअर पुरूष गटात ध्यानचंद संघाने अजिंक्यपद पटकाविले. अमरावती मार्गावरील व्हीएचवर शनिवारी (ता.14) स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. अत्यंत चुरशीच्या सामन्यात ध्यानचंद संघाने इगल क्लबचा 9-8 ने पराभव करून विजेतेपदावर मोहोर उमटविली. फुल टाईमध्ये दोन्ही संघ 2-2 अशा बरोबरीत राहिले. ध्यानचंद संघाकडून कुणाल ठाकुरने 26 आणि 37 व्या मिनिटाला दोन गोल नोंदविले. तर मोहित काथुटेने 52 आणि 60 व्या मिनिटाला गोल करून इगल क्लबला बरोबरीत आणले.

टायब्रेकरमध्ये ध्यानचंद क्लबने 7 गोल नोंदविले. इगल क्लबला मात्र 6 गोलच करता आल्याने सामना ध्यानचंद संघाच्या पारड्यात गेला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शिवसेना पक्षबांधणीसाठी कार्यकर्त्यांशी संवाद.

Sun Jan 15 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 15 :- कामठी_विधासभेतील कामठी तालुक्यातील लिहिगाव येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व युवासेना पदाधिकारी व शिवसैनिकांची बैठक घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी शिवसेना-युवासेना पक्ष वाढीबद्दल चर्चा केली.. येणाऱ्या काळात ह्या क्षेत्रात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत यांच्या सोबत अनेक शिवसैनिक जुळतील असा विश्वास येथील पदाधिकाऱ्यांनी दिला… यावेळी शिवसेना संघटक दिपक मुळे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!