घरफोडीचा गुन्हा उघडकीस ३०,४९,०८०/- रु. चा मुद्देमाल जप्त 

नागपूर :- दिनांक १९.०५.२०२३ चे ०१.१० वा. ते ०३.२० वा. चे दरम्यान पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीत प्लॉट नं. १५१, केटीनगर, गार्डनजवळ, नागपुर येथे राहणारे फिर्यादी हेमंत शरद पांडे वय ५५ वर्ष हे रायगड, छत्तीसगढ येथे साउथ इस्टर्न कोल्ड फिल्ड लिमी येथे जनरल मैनेजर आहेत. त्यांची पत्नी व मुलगी हे फिर्यादीला भेटण्याकरिता घराचे दाराला कुलूप लावून रायगड आल्या असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे घराचे लोखंडी गेट व मुख्य दाराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करून घरातील बेडरूम मधील लोखंडी कपाटातून सोन्याचे ३ बिस्कीटे प्रती १०० ग्रॅम. ३ नग, सोन्याचे सिक्के प्रती १० ग्रॅम ४ नग व नगदी २१,०००/रु, असा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी यांनी घरी येवुन सिसीटिव्ही फुटेज चेक करून दिलेल्या तक्रारीवरून पो. गुणे गिट्टीखदान येथे अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ४५७, ३८० भादति अन्वये गुन्हा नोंद होता.

गुन्हेशाखा, यनिट क. ३ से अधिकारी व कर्मचारी यांनी गुन्हयाचे समांतर तपासात गुप्तबातमीदाराकडुन मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून तसेच तांत्रीक तपास करून गुन्हयातील आरोपी यास दिनांक २३.०५. २०२३ चे सकाळी ०८.३० वा. चे सुमारास मनसर कांद्रा रेल्वे लाईन परीसरात सापळा रचुन ताब्यात घेतले आरोपीस त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अनिकेत निलकंठ वाढीवे वय २४ वर्ष रा. कांद्री लाईन्स, मनसर रोड, नागपूर असे सांगितले. त्यास गुन्हयाबाबत विचारले असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली. अधीक सखोल विचारपुस केली असता आरोपीने गुन्हयातील चोरी केलेला मुद्देमाल व इतर असा १) २०४ सोन्याचे बिस्कीटे, प्रती १०० ग्रॅम, एकुण ४०० ग्रॅम. २) ०१ सोन्याचा सिक्का १० ग्रॅम, ३) सोन्याचे दागीने  १२,०००/- रु. असा एकुण ३०,४९,०८०/- रू चा मुद्देमाल काढून दिल्याने तो जप्त करण्यात आला. आरोपीस मुद्देमालासह पुढील योग्य कारवाईस्ताव गिट्टीखदान पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. वरील कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) संजय पाटील,पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन) मुम्मका सुदर्शन, सहायक पोलीस आयुक्त मनोज सिडाम यांचे मार्गदर्शनाखाली पोनि महेश सागडे, सपोनी. पवन मोरे, पोउपनि मधुकर कोठाके, बलराम झाडोकर, सफौ. सतिश पांडे, दशरथ मिश्रा, मुकेश राउत, रविन्द्र सावरकर, आनंद काळे, मिलींद चौधरी, अनिल बोटरे, पोन विशाल रोकडे, जितेश रेड्डी, दिपक लाकडे, रविन्द्र करदाते यांनी केली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com