मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्येष्ठ संपादक कैलास म्हापदी, पत्रकार संजय पितळे,विनोद जगदाळे, डॉ.दिलीप सपाटे, जयेश सामंत, विभव बिरवटकर सन्मानित

ठाणे :- राज्य शासनाच्या “शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी” समितीवर ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ संपादक कैलास म्हापदी यांची, तसेच राज्य व विभागीय अधिस्वीकृती समितीवर पत्रकार संजय पितळे, विनोद जगदाळे, डॉ. दिलीप सपाटे, जयेश सामंत आणि विभव बिरवटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.            ठाणे महानगरपालिका व ठाणे दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि.20 ऑगस्ट) रोजी झालेल्या “राष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन व पारितोषिक वितरण” सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या सर्वांचा सन्मान करण्यात आला.             या सोहळ्यास आमदार प्रताप सरनाईक, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, माजी महापौर नरेश म्हस्के, ठाणे दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, सचिव नीलेश पानमंद, कोषाध्यक्ष विभव बिरवटकर, मनोज सिंग, पदाधिकारी, पारितोषिक विजेते छायाचित्रकार, नागरिक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

औरंगाबाद, जालना, हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यात मुलींचे बालगृह सुरु करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार - बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष ॲड. सुशीबेन शहा

Tue Aug 22 , 2023
मुंबई :- औरंगाबाद – मराठवाडा विभागातील औरंगाबाद, जालना, हिंगोली व उस्मानाबाद या चार जिल्ह्यात मुलींचे बालगृह सुरु करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे, असे बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शहा यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत ‘पोक्सो’ व बाल न्याय अधिनियम कायद्यांतर्गत दाखल प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी औरंगाबाद विभागात आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com