भिलगावच्या ऑनलाईन राज लॉटरी सेंटरवर डीसीपी पथकाची धाड

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या लकी सेवन /डबल चान्स या ऑनलाईन लॉटरी सेंटरच्या गेमवर पैसे घेऊन हार जीत चा जुगार व्यवसाय कामठी तालुक्यातील भिलगाव येथील राज लॉटरी सेंटरवर सुरू असल्याची गुप्त माहिती डीसीपी पाच च्या पथकाला कळताच पोलिसांनी काल सायंकाळी पाच दरम्यान यशस्वीरीत्या धाड घालून 10 आरोपीविरुद्ध भादवी कलम 4,5 महाराष्ट्र जुगार कायदा अनव्ये गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून 1 लक्ष 45 हजार 100 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दहा आरोपीमध्ये राकेश राम वृक्ष रावत वय 47 वर्ष राहणार अग्रसेन नगर भिलगाव, आकाश प्रकाश नारनवरे वय 37 वर्ष राहणार तक्षशिला बौद्ध विहार पाटील नगर पोलीस ठाणे यशोधरा नगर, राकेश देवानंद डोंगरे वय 28 वर्ष राहणार भीमवाडी झोपडपट्टी उपलवाडी, सुरेश धोरणलाल नेवारे वय 38 वर्ष राहणार मनी नगर झोपडपट्टी मांडवा, कामठी रोड, अनिल रमेश शिरसिकर वय 32 वर्ष राहणार माजरी, काच कंपनी जवळ, राजेश एकनाथ पाकिड्डे वय 51 वर्ष रानात रमानगर सम्यक बौद्ध विहार जवळ कामठी, गोमलाल परसराम यादव वय 57 वर्ष राहणार गोविंदगड उपलवाडी, आवेश जलधर जी लोखंडे वय 43 वर्ष राहणार विश्वभारती नगर, नाका नंबर 2, वसंता दादाजी देवगिरीकर वय 60 वर्ष राहणार नाका नंबर 2 विश्वभारती नगर तसेच पसार आरोपी राजेश नंदनवार ना राहणार मानेवाडा, नागपूर असे आहे.

राज लॉटरी सेंटर वर घातलेल्या धाडीतून नगदी 18500/- रुपये, बीपीएल कंपनीच्या 32 इंची एलसीडी किंमत अंदाजे 12000 /-, एम आय कंपनीचा 32 इंची एलसीडी किंमत अंदाजे 10,000/-,चॅलेंजर कंपनीचा 32 इंची एलसीडी किंमत अंदाजे 12000 रुपये, 3 नग इंटर कंपनीचा 12 इंची मॉनिटर किंमत अंदाजे 9000 रुपये, एक झेब्राॅनिक कंपनीच्या कीबोर्ड 150/-,एक ईव्हीएम कंपनीच्या कीबोर्ड 150/-, एक झेब्राॅनिक कंपनीच्या सीपीयू किंमत अंदाजे 5000 रुपये, एक ईव्हीएम कंपनीच्या सीपीयू किंमत अंदाजे 5000 रुपये, 2 नग ईव्हीएम कंपनीचे माऊस किंमत अंदाजे 300/-, Real pos कंपनीचे दोन प्रिंटर किंमत अंदाजे 3000/-, एक जिओ कंपनीच्या राऊटर किंमत अंदाजे 1000/-,सात मोबाईल फोन्स असे एकूण 1,45,100 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही यशस्वी कारवाही डिसीपी निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनार्थ डीसीपी पाच पथकाचे एपीआय जितेंद्र ठाकूर, अंकुश गजभिये ,योगेश ताथोड,रवी शाहू,अरुण चांदणे आदींनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागपूर विमानतळावर स्वागत 

Mon Feb 12 , 2024
नागपूर :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज रविवारी दुपारी ४.३५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आगमन झाले. गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजनासाठी ते आले होते. सायंकाळी रामटेक येथील नेहरू मैदानावर आयोजित कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होणार आहेत. नागपूर विमानतळावर त्यांचे पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र कुमार सिंगल, महानगरपालिका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी,जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी आदींनी त्यांचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com