संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या माध्यमिक इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल नुकताच ऑनलाइन जाहीर झाला त्यात स्व.इंदिरा गांधी उच्च प्राथ.माध्य. व कनिष्ठ महाविद्यालय निमखेडा तालुका मौदा येथे दहावीचा विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे सुयश मिळविले त्यात 92:98 टक्के निकाल लागला त्यात प्रथम दिव्या धांडे, द्वितीय कोमल आत्राम, तृतीय प्रगती समर्थ यांनी क्रमांक पटकावला या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष विशाल खांडेकर, डॉ.विश्रांती खांडेकर, रक्षक खांडेकर शाळेच्या (मुख्याध्यापिका प्राथमिक) शांता खांडेकर, अलका के वासनिक (मुख्याध्यापिका माध्यमिक), (पर्यवेक्षिका) तेजस्विनी वी.खांडेकर (कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख सिद्धार्थ उके, बुजाडे , गणवीर, डाखोडे , जांबुडे , भोवते , नागपूरे , वाकोडकर , तसेच समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गण पालक वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.