मुंबई :- राज्यातील सहा उमेदवारांची राज्यसभेच्या सदस्यपदी निवड झाली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे, अशोकराव चव्हाण (माजी मुख्यमंत्री) आणि शिवसेनेचे मिलिंद देवरा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रफुल्ल पटेल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांची महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवड झाली.
राज्यसभेच्या १५ राज्यातील ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी निवडणूक होणार होती. राज्यात उमेदवारीचा अर्ज मागे घेण्याची तारीख २० फेब्रुवारी होती. राज्यसभेवर महाराष्ट्राच्या सहा जागांसाठी सहा अर्ज प्राप्त झाल्याने, या सहा जणांची निवड करण्यात आली आहे. २ एप्रिल २०२४ मध्ये राज्यसभा सदस्यांची मुदत संपल्यानंतर या उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे राज्य विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.