अमरावती विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील कलावंत, स्पर्धक, साथीदार चमूंची विविध स्पर्धेसाठी निवड

अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या युवा महोत्सव 2022 मधील कलावंत, स्पर्धक, साथिदार चमूंची विविध स्पर्धेकरीता ए.आय.यू. नवी दिल्ली यांचे पात्रता नियमानुसार युवा महोत्सव चमूमध्ये तात्पुरती निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य -2022, पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ युवा महोत्सव आणि अखिल भारतीय आंतर विद्यापीठ राष्ट्रीय कव्वाली या स्पर्धेचा यात समावेश असून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे ही चमू या तीनही स्पर्धेत प्रतिनिधीत्व करणार आहे.

चमू प्रशिक्षण कालावधी

महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य -2022 करीता प्रशिक्षण 20 ते 23 ऑक्टोबर, 2022 व 27 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर, 2022 या कालावधीत होणार आहे. हा महोत्सव महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे दिनांक 5 ते 9 नोव्हेंबर, 2022 दरम्यान होणार आहे. पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ युवा महोत्सव स्पर्धेकरीता चमूंचे प्रशिक्षण 1 ते 15 जानेवारी 2023 दरम्यान होणार आहे. ही स्पर्धा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे दि. 17 ते 21 जानेवारी, 2023 दरम्यान होईल. तर अखिल भारतीय आंतर विद्यापीठ राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेचे आयोजन शारदा विद्यापीठ, नोेएडा, (उत्तरप्रदेश) येथे होणार असून या स्पर्धेच्या चमूंच्या प्रशिक्षणाच्या तारखा आयोजक विद्यापीठाकडून प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थी विकास विभागाकडून स्वतंत्ररित्या कळविण्यात येतील.

संपर्क

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ युवा महोत्सव विविध चमूतील स्पर्धक, कलावंत, साथिदार व चमू व्यवस्थापक यांनी नमूद तारखेस व वेळेवर डॉ. राजीव बोरकर, संचालक, विद्यार्थी विकास, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यांचेशी स्वामी विवेकानंद भवन, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, विद्यापीठ परिसर, अमरावती येथे संपर्क साधावा.

निवड झालेल्या कलावंत, स्पर्धक, साथीदार यांची नावे

फाईन आर्टकरीता श्री शिवाजी विज्ञान महा., ची  रुद्राणी बारब्दे, कॉलेज ऑफ अॅनिमेशन बायो इंजि. अँड रिसर्च सेंटर अमरावतीच संकल्प गवई व यश इंगोले, वादविवाद स्पर्धेकरीता कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, अकोलाची  सकीना अली, श्रीमती केशरबाई लाहोटी महा., अमरावतीची  गौरी ककरानिया, इन्स्टिटट ऑफ फार्मसी अँड रिसर्च बडनेराची  हुसैनी नकीसा शब्बीर, वक्तृत्व स्पर्धेकरीता श्रीमती राधादेवी गोयनका महिला महा., अकोलाची खुशी खत्री, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेचा मनिष पोकळे, वेस्टर्न सोलो या स्पर्धेकरीता सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, अमरावतीची श्रेया शेळके, शास्त्रीय गायन स्पर्धेकरीता श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महा., अकोलाची वैष्णवी महल्ले, सुगम संगीत करीता श्री शिवाजी कला व वाणिज्य महा., अमरावतीचा ऋतिक मोरे, शास्त्रीय वाद्य संगीत तालवाद्य करीता सिताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महा.,अकोलाचा पवन सिडाम, श्री शिवाजी कला व वाणिज्य महा., अमरावतीचा अभिषेक लोखंडे, स्वरवाद्य स्पर्धेकरीता महात्मा ज्योतिबा फुले महा., अमरावतीचा रोहन खंडारे,, श्री शिवाजी कला व वाणिज्य महा., अमरावतीचा चेतन वानखडे, समूहगान (भारतीय) याकरीता पदव्युत्तर शैक्षणिक विभाग, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची स्वरश्री केतकर, श्री शिवाजी विज्ञान महा., अमरावतीचा मयुरेश वानखडे, श्रीमती केशरबाई लाहोटी महा., अमरावतीचा ऋषिकेश दुधाळे, महात्मा ज्योतिबा फुले महा., अमरावतीचा राहूल पवार,महिला महा., अमरावतीची निकिता मोने, शास्त्रीय नृत्य करीता पी.आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ इंजि. अँड मॅनेजमंेट, अमरावतीची करिश्मा पिहूलकर, डॉ. पंजाबराव देशमुख विधी महा.,ची वैदेही काकडे, समूहनृत्य स्पर्धेकरीता शासकीय अभियांत्रिकी महा., अम. ची मधुरिका धात्रक व  कादंबरी जमदाडे, श्रीमती केशऱबाई लाहोटी महा., अम. ची  चैनी पंचारिया व ऋषभ सिरसाट, श्री शिवाजी कला व वाणिज्य महा., अम. ची  अंजली गावंडे, श्री शिवाजी विज्ञान महा., अम. ची मानसी मेंदाड, अमन ठाकूर, प्रज्वल भुजाडे, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अम. चचा हिमांशू जैन, विद्याभारती महा., अम. चा शंतनू ठाकरे व मौसमी राठोड, भगवंतराव शिवाजी पाटील महा. परतवाडाचा राज राऊत, हेमंत नृत्य, संगीत, कला महा., अम. चा छगन पवार, पाश्चिमात्य समूहगान करीत श्री शिवाजी विज्ञान महा., अम. चा वेदांत उमरे, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेची  दिव्या बसोले, श्री शिवाजी कला व वाणिज्य महा. अम. चा निखिल पाठक, फोक् ऑर्केस्ट्रा / पाश्चिमात्य वाद्य या स्पर्धेकरीता शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अम. चा क्रिश आत्राम व हर्षवर्धन भालेराव, सर्वेश पाठक, श्रीमती नानकीबाई वाधवाणी कला महा. यवतमाळचा अस्मित अकाले, विद्याभारती महा. अम. चा गौरव जोंधळे, एकांकिका /स्किट/माईम/मिमिक्री या करीता पदव्युत्तर शैक्षणिक विभाग, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा शुभम ठाकरे व अमेय अनसिंगकर, विद्याभारती महा., अम.चा यश विरुळकर, प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, अम.चा अनिकेत पापडकर, शासकीय अभियांत्रिकी महा. अम.ची वैष्णवी चव्हाण, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, अकोलाची श्रृती देशपांडे व सार्थक बोरे, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन,अम. ची कु. राजनंदिनी श्रीनाथ, प्रो राम मेघे इन्स्टिटट ऑफ टेक्नॉलॉजी अँ़ड रिसर्च, बडनेराचा जयेश जामनेकर, ब्राजलाल बियाणी महा अम. चा शुभम सुधा, लोकनायक बापुजी अणे महिला महा. यवतमाळची आरती राठोड, साथिदार करीता अमरावतीचे डॉ. कैलास नेरकर, प्रशांत ठाकरे, प्रकाश मेश्राम, अमोल अढाऊ, अभिजित भावे, अविनाश पाटील, परतवाडाचा कार्तिक नंदवंशी, चमू व्यवस्थापक म्हणून (इंद्रधनुष्य व पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ युवा महोत्सव स्पर्धेकरीता) श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महा. अकोलाचे डॉ. सोपान वतारे, स्व. छगनलाल मुलजीभाई कढी कला महा., अचलपूर कॅम्प च्या डॉ. सारिका श्रावणे, मिलिंद महा., मुळावा, जि. यवतमाळचे डॉ. अनिल काळबांडे, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अम. च्या डॉ. मुक्ता महल्ले, राष्ट्रीय आंतर विद्यापीठ कव्वाली स्पर्धेकरीता चमू व्यवस्थापक म्हणून श्रीमती नानकीबाई वाधवाणी कला महा., यवतमाळचे डॉ. निखिल नलोडे, लोकमान्य टिळक महा., वणी, जि. यवतमाळच्या डॉ. निलिमा दवणे यांचा समावेश आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गोरेवाडा रेस्क्यू सेंटरला वाघ पंधरा पिंजरे दहा !

Thu Oct 20 , 2022
नागपूर :- विदर्भात वन्यजीवांसाठी प्रमुख समजल्या जाणाऱ्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरला सध्या कमी पिंजऱ्यांची समस्या भेडसावत आहे. वाघांची संख्या पंधरा अन पिंजरे मात्र दहा आहेत. १३ जणांचा बळी घेणाऱ्या सी-1 नावाच्या वाघाला येथे आणण्यात आल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या नरभक्षी वाघाला ठेवण्यासाठी प्रशासनाकडे पिंजरे नव्हते. शेवटी या वाघाला अस्वलाच्या रिकाम्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे. Follow us on Social […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!