संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– कामठी पत्रकार संघाची मागणी
कामठी :- राज्य शासनाने राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे कामठी तालुक्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळांना ही हा नियम लागू होणार आहे मात्र असे झाल्यास गोरगरिबांची मुले शिक्षणापासून कायमचे वंचीत राहतील तेव्हा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यात येऊ नये अशी मागणी कामठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येत आहे.
सर्व घटकातील मुलांना शिक्षण देता यावे याकरिता सर्व शिक्षा अभियान ही योजना राबविण्यात आली.सहा ते 14 वर्षे वयोगटातील सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण देता यावे हा या योजनेचा मुख्य उद्देश या योजनेचा लाभ समाजातील सर्व घटकातील मुला मुलींना झाला.प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीरण करण्यात आल्याने ठिकठिकानी शाळा सुरू आहेत.परिणामी मुले शैक्षणिक प्रवाहात आहेत.परंतु राज्य शासनाने नुकताच राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा लघुलकी निर्णय घेतला.या निर्णयामुळे शेकडो गरीब मुले शिक्षणापासून वंचित राहतील त्यामुळे हा निर्णय मागे घेत कमी पटसंख्याच्या शाळा बंद करण्यात येऊ नये अशी मागणी कामठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.