सावनेर – स्थानिक जवाहरलाल नेहरू हायस्कूल, सावनेर येथे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे आयोजित शिष्यवृत्ती परीक्षा २०१९-२० मध्ये २७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.त्यापैकी ५ विद्यार्थी पात्र ठरले असून २ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरलेले आहे. पात्र विद्यार्थी यशवंत चौधरी,नेहा पारधी,कृतिका भिंगारे,प्रतिक्षा बर्वे व रौनक उनपाने यांचा विद्यालयाच्या वतिने गौरव करण्यात आला.त्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.रणजितबाबू देशमुख, डॉ.आषिशबाबू देशमुख,विद्यालयाचे पालक संचालक ॲड.चंद्रशेखर बरेठिया, मुख्याध्यापिका कमल बुऱ्हाण यांनी विद्यार्थ्यांचा गौरव केला व भविष्यातील प्रगतीबाबत सुयश चिंतीले.
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय्य आई वडील, मार्गदर्शक चौधरी सर,वडे सर,झिले सर,ढोके मॅडम,गोरले मॅडम यांना दिले.याप्रसंगी बन सरांनी विशेष सहकार्य केले.
शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांचेविद्यालयातर्फे अभिनंदन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com