नागपूर :- उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरमपेठ येथील झेंडा चौक आणि गाडगा गल्ली क्र. ४ येथील गणेश मंडळाला भेट देवून दर्शन घेतले. यानंतर त्यांनी कॉटन मार्केट येथील गणेश उत्सव मंडळ, श्री.अशोकस्तंभ गणेशोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट, श्री संत गणेशोत्सव व सांस्कृतिक मंडळ, दक्षिणामुर्ती स्वयंसेवक गणेशोत्सव मंडळ यांच्या दर्शनास नगरसेविका चेतना टांक यांच्या क्वेटा कॉलनी येथील निवासस्थानी गणरायाची पूजा अर्चा करून दर्शन घेतले.
नवीन सुभेदार ले-आऊट येथील अश्वमेध गणेशोत्सव मंडळ,खैरी कुणबी समाज गणेश मंडळ आणि दिघोरी घाट रोड येथील श्री गणेश मित्र मंडळांस त्यांनी भेट दिली आणि गणरायाची पुजाअर्चा करून दर्शन घेतले. यावेळी गणेश मंडळांकडून फडणवीस यांचे शाल व श्रीफळ देवून स्वागत करण्यात आले. लोकप्रतिनिधी आणि मंडळांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.