संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- समाजातील सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासन विविध शासकीय योजना राबवत असतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा या महत्वाकांक्षी उपक्रमातुन सर्व योजनांची माहीती लक्षित लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहे असे मौलिक प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी केले.
केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी ‘विकसित भारत संकल्प यात्रा रथ’योजनेच्या प्रचार प्रसिद्ध मोहिमेत विविध ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे भाषण थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले त्यानुसार कामठी तालुक्यातील गुमथळा येथिल तुळजा भवानी महाविद्यालयाच्या पटांगणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे देशातील विविध राज्यातील लाभार्थीसोबत साधलेल्या संवाद कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले होते.याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित असलेले राज्याचे ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकासामध्ये गरुड भरारी झेप घेतली आहे.देशाची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर पोहोचून देशाची प्रतिमा जगभरात उंचावत आहे.देशाच्या चौफेर विकासाबरोबरच विविध कल्याणकारी योजनाद्वारे सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचे काम करण्यात येत आहे.
या कार्यक्रमात विकसित भारत संकल्प यात्रेचे नोडल अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाप्पासाहेब नेमाने, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविंद्र मनोहरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत कपिल कलोडे, उपविभागीय कृषि अधिकारी सोनाली हजारे, कामठीचे तहसिलदार अक्षय पोयाम, गट विकास अधिकारी प्रदीप गायगोले, तालुका कृषि अधिकारी दिपाली कुंभार, मंडळ कृषि अधिकारी बंडोपंत गौरखेडे, पंचायत समितीचे कृषि अधिकारी लोखंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अनील निधान, सरपंच प्रणाली डाफ, उपसरपंच महेश काकडे, कृषि पर्यवेक्षक विराग देशमुख आणि पुनमताई माळोदे, इफ्कोचे व्यवस्थापक मगर आणि ग्राम विकास, महसूल आणि कृषि व इतर सलग्न विभागाचे ग्राम स्तरीय कर्मचारी तसेच या भागातील लोकप्रतिनिधी आणि महिला आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी विविध विभागांनी आपापल्या विभागाच्या योजनांचा प्रचार प्रसार केला आणि उमेद अंतर्गत विविध महिला गट, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजने अंतर्गत सुरू केलेल्या उद्योगाच्या उत्पादनाचे प्रदर्शन आणि विक्री मेळावा आयोजित करण्यात आला. या प्रसंगी राज्याच्या ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांचे हस्ते शेतक-यांना जमिनीच्या आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात आले तसेच ड्रोन द्वारे किटकनाशके आणि खत फवारणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच आरोग्य विभागाद्वारे वैद्यकीय तपासणी करण्यात आल्या. या कार्यक्रमात प्रधानमंत्री पिक विमा योजना, पीएम-सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, पीएम-किसान सन्मान योजना, पीएम-प्रणाम (मृद् आरोग्य सुधारणा), पीएम-उज्वला योजना, पीएम-आयुष्यमान भारत योजना, पीएम-स्वानिधी योजना, पीएम-मुद्रा योजना, इ. विविध योजनांची माहिती देण्यात आली.