SCGT नागपूर चॅप्टर तर्फे महिला दिवस साजरा

– नागपुरातील विविध क्षेत्रांतील ७ महिलांचा गौरवपूर्ण सत्कार

नागपूर :- Saturday Club Global Trust (SCGT) नागपूर चॅप्टरच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ७ महिलांचा सत्कार करण्यात आला.

शनिवारी चिटणवीस सेंटर येथे झालेल्या या सोहळ्यात आदित्य अनघा बँकेच्या अध्यक्ष अनघा सराफ, क्रीम्स हॉस्पिटलच्या संचालिका केतकी अरबट, पॅरेंटिंग कौन्सेलर मेधा मुजुमदार, ऍथलेट आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रभा भैया, देहात फाउंडेशनच्या संस्थापक वृंदन बावनकर – घाटगे, सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या लीना बुद्धे आणि अंकशास्त्रज्ञ सायली देशपांडे यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला SCGT नागपूर चॅप्टरचे अध्यक्ष बागेश महाजन, सचिव अमित बोरकर, कोषाध्यक्ष शरद अरसडे तसेच क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी सत्कारमूर्तींनी आपल्या क्षेत्रातील अनुभव कथन करत उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन श्वेता सहस्रभोजनी यांनी केले, तर आभार प्रदर्शन चैताली बांगरे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्लबच्या सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आदिवासी मुलींना शिक्षण मिळणे ही काळाची गरज - राज्यमंत्री इंद्रनील नाईक

Sun Mar 9 , 2025
Ø पुसद येथे जागतीक महिला दिन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार Ø आदिवासी बचत गट, वैयक्तीक वनहक्कधारकांचा मेळावा यवतमाळ :- आदिवासी समाजातील मुले शिक्षण घेऊन उच्चपदावर नियुक्त होत आहे. ही अतिशय अभिमानास्पद आणि आनंदाची बाब आहे. या समाजातील प्रत्येक गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबातील मुलींना देखील चांगले शिक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास राज्यमंत्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!