संदीप बलविर, प्रतिनिधी
नागपूर :- बुटीबोरी जवळील सातगाव ग्रामपंचायतला आय एस ओ दर्जाचे नामांकन प्राप्त झाले आहे.गुरुवार दि २६ जाणे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आय एस ओ प्रमाणपत्र ग्रामपंचायत सरपंच योगेश सातपुते यांना प्रदान केले.
शासकीय काम म्हटले की,दप्तरदिरंगाई असे समीकरणच बनले आहे.मात्र सातगाव ग्रामपंचायतने जलद व योग्य प्रकारे सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी फलक लावून प्रत्येक बाबीची माहिती दिल्याने नागरिक व प्रशासनाला कामे करतांना सुलभता निर्माण झाली.याची दखल घेत ग्रामपंचायत व सर्व गावाचे निरीक्षण करून आय एस ओ चे ऑडिटर विनोद कोल्हे,जागृती कुबेटकर यांनी सातगाव ग्रामपंचायत चे सरपंच योगेश सातपुते, उपसरपंच प्रविना शेळके यांना गुरुवार दि २६ जाणे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आय एस ओ प्रमाणपत्र ग्रामपंचायत ला प्रदान केले. सातगाव ग्रामपंचायत सरपंच योगेश सातपुते यांच्या पुढाकारातून वर्षभरातच गावाचा कायापालट होऊन स्वच्छ व सुंदर ग्रामपंचायत कार्यालय बनविले.त्यामुळे प्रशासकीय स्तरावर झालेल्या सर्वेक्षणातून ही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या नजरेत आली.आरोग्य, साफसफाई व अत्यावश्यक सेवेसाठी यंत्रणेने व गावकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले असे मनोगत सरपंच योगेश सातपुते यांनी व्यक्त केले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य अरून कोडापे, सुनिता भुसारी, पल्लवी कैकाडी, नंदकिशोर कांबळे, सुनिता गोडघाटे गावातील नागरीक सतिश शेळके, सुधाकर धामंदे, तुळशीराम झाडे, दिवाकर कैकाडी, नरेश गोडघाटे, यादवराव चकोले, डोमाजी वाटकर, राजु गोखरे, प्रकाश घायवट, शैलेश नागपुरे, अशोक पिपंळकर, गणेश झाडे, सुरेश ठावरे, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.