कोदामेंढी :- अरोली-कोदामेंढी जि. प. क्षेत्र व कोदामेंढी पं. स. क्षेत्र परिसरात असलेल्या तांडा गट ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या श्रीखंडा येथे मागच्या वर्षी जलजीवन मिशन अंतर्गत १३ लक्ष रूपये निधीतून पाण्याच्या टाकीचे काम सुरू होते मात्र चार महिन्यापूर्वी ३लक्ष रूपये घेऊन ठेकेदार जलील काम सोडून पसार झाल्याचे सरपंचा मनोरमा मुरलीधर डोरले यांनी सांगितले.
भ्रमणध्वनीवरून ठेकेदार जलील यांच्याशी संपर्क साधला असता ज्या मिस्त्र्याकडे हा काम दिला होता.तो मिस्त्री काम सोडून पसार झाल्याने दुसरा मिस्त्री शोधल्यानंतर कामाला सुरुवात करणार असल्याचे व सध्या मिस्त्री व लेबरचा तुटवडा असल्याने सांगितले.