पुन्हा निर्भया  प्रकरण ; महिलावर सामुहिक बलात्कार..

अमरदिप बडगे, प्रतिनिधी

गोंदिया/भंडारा :- भंडारा जिल्हात सामुहिक बलात्कार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे , प्राप्त माहिती नुसार  पीड़ित महिला गेल्या काही महिन्यांपासून बहिणी सोबत राहत होती . घरगुती वादातून एकटीच माहेरी जाणाऱ्या 35 वर्षीय  महिलेवर भंडारा जिल्ह्यातील कन्हाळमोह जंगलात नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर ती बेशुद्धावस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना कारधा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.  पीडित महिलेला या अत्याचारामुळे प्रचंड रक्तस्राव होत होता. त्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणासारखी ही घटना असल्याचे बोलले जात आहे. पीडित महिला ही गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी आहे. ती ३० जुलैला घरगुती वादातून एकटीच माहेरी जाण्यासाठी निघाली.

वाटेत तिला श्रीराम (वय ४५) भेटला. त्याने तिला चारचाकीने घरी सोडतो असे सांगितले. मात्र, तिला घरी न नेता मुंडीपार (जि. गोंदिया) या गावाजवळ नेले व रात्री तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (ता. ३१) पळसगाव रस्त्यालगत पुन्हा त्याने तिच्यावर अत्याचार केला व जंगलात सोडून दिले. सोमवारी (ता. १) घरी सोडण्याच्या बहाण्याने दोघांनी शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडिता बेशुद्धावस्थेत पडून असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिला जिल्हा रुग्णालयात व नंतर नागपुरात शासकीय रुग्णालयात दाखल केले.  या प्रकरणात दोन जणांना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करीत आहे..

 

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com