लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक

– दिनेश दमाहे,मुख्य संपादक

नागपूर –  पोस्टे खापा अप.क्र. 38/2022 कलम 376 (2)(द) भादंवि या गुन्हयातील पिडीतेला आरोपीने लग्नाचे आमिश दाखवून तिचे सोबत वारंवार शारिरीक संबंध प्रस्थापित केले. सदर पिडीतेला आरोपीचे नाव इम्रान असल्याचे माहित असुन त्याव्यतिरीक्त तिला अरोपीबाबत कुठलीही माहिती नव्हती. आरोपीविरूध्द नमुद गुन्हा दाखल झाल्याच्या दिवसापासुन स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपीचा शोध घेण्यात येत होता. याचदरम्यान पोलीसांना एक मोबाईल नंबर मिळून आला, सदर मोबाईल फोन बहुतेक आरोपी वापरीत असल्याचा अंदाज घेत पोलीसांनी मोबाईल फोनच्या सुगाव्यावरुन आरोपीचा मागोवा काढला असता दिनांक 09.02.2022 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास
आरोपी नामे इम्रान शफीक अन्सारी वय 20, रा. प्लॉट नं. 605, पिली नदी, संघर्ष नगर सुरा मस्जिद जवळ नागपूर हा दहेगाव (रंगारी) येथे असल्याची खात्रीशिर माहिती प्राप्त झाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या सहा.पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, जितेंद्र वैरागडे, पोलीस हवालदार राजेंद्र रेवतकर, अमोल कुथे, पोलीस नायक आशिष मुंगळे, किशोर वानखेडे, उमेश फुलबेल, रोहण डाखोरे आणि अमोल वाघ यांनी आरोपीस दहेगाव (रंगारी) येथुन ताब्यात घेवुन पोस्टे खापा यांचे स्वाधीन केले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com