शेकडोच्यावर सापांना दिले सर्पमित्रानी जीवनदान

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- अनेक ठिकाणी रात्री अपरात्री साप निघाल्यानंतर लगेच सर्पमित्रांची अनेकांना आठवण येते.कुठेही साप मारला जाऊ नये यासाठी सर्पमित्रांची धडपड सुरू असताना वाईल्डलाईफ वेल्फेअर सोसायटी कामठी कन्हान चे सर्पमित्र प्रयत्नशील असतात तर यांनी शेकडोच्या वर सापांना पकडून जिवनदान दिले आहे.

साप म्हटले की अनेकांच्या छातीमध्ये धडकी भरते, प्रत्यक्षात साप पाहिल्यानंतर बऱ्याच जणांची घाबरगुंडी उडते. अशा परिस्थितीत काहीजनांच्या निवासस्थानात ,शासकीय, निमशासकीय कार्यालय यासह अन्य ठिकाणी रात्री अपरात्री साप निघाल्याच्या अनेक घटनां घडल्या आहेत.साप दिसताच संबंधित व्यक्तीकडून सर्पमित्रांशी तात्काळ संपर्क साधला जातो दिवसरात्र, ऊन,थंडी, पाऊस कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता हे सर्पमित्र मिळेल त्या वाहनाने सदर घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करतात .वाईल्ड वेल्फेअर सोसायटी कामठी कन्हान हे सर्पमित्र मागील बऱ्याच वर्षांपासून साप पकडत आहेत अनेक ठिकाणी नाग,मण्यार,घोणस,फुरसे,असे विविध विषारी प्रजातीचे साप त्यांनी पकडून मानव वस्तीमधून जंगलात नेऊन सोडले आहेत.हे सर्पमित्र मागील अनेक वर्षापासून ज्या ज्या ठिकाणी साप निघाले त्या त्या ठिकाणी तात्काळ पोहोचुन सापाला धरून त्यांना जीवनदान देण्याचे कार्य करीत आहेत.या वाईल्डलाईफ वेकफेअर सोसायटी कामठी कन्हान चे सर्पमित्र शेखर बोरकर,बबलु मुलुंडे,आशीष मेश्राम,प्रशांत बोरकर,अनिल बोरकर मोलाची भूमिका साकारत आहेत.

सापाने दंश केल्यानंतर प्रति विष हाच एकमेव उपाय आहे. यासाठी आधी रुग्णालयात जा. काही ठिकाणी भोंदू व्यक्तिकडून मंत्रतंत्र मारून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे मंत्रतंत्र हा कायद्याने गुन्हा असल्याचे वाईल्ड वेल्फेअर सोसायटी कामठी-कन्हान च्या सर्पमित्रानी सांगितले.वाइल्डलाइफ वेलफ़ेयर संस्था ही स्नेक बाईट वर सुद्धा काम करते मेडिकल मेयो ला आलेले सर्पदंश रुग्ण याना देखिल मदत करतात .साप चावले की मांत्रिक कड़े न जाता दवाखान्यात जा अशे या संस्थेतर्फ़े आव्हान करन्यात आले आहें..

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गिरणी कामगारांच्या घरांसाठीच्या अर्जांची छाननी तीन महिन्यांत पूर्ण करावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Tue Aug 22 , 2023
मुंबई :- गिरणी कामगारांच्या घरांसाठी प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करावी. मुंबईत घरे देता यावी याकरिता घरांचा साठा वाढवावा, तसेच ठाणे व राजगोळी, कोन-पनवेल येथील घरांची तातडीने दुरुस्ती करून पाच हजार घरांची लॉटरी प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश देतानाच गिरणी कामगारांच्या घरांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com