संदीप बलविर ,प्रतिनिधी
नागपूर :- बुट्टीबोरी औधोगिक क्षेत्रामधील विदर्भ इंडस्ट्रीज प्रायवेट लिमी कंपनी मध्ये सोमवार दि १२ डिसें ला सायं ६:३० वाजताच्या जवळपास ६ फुटाचा अजगर आढळुन आला.
साप हा प्राणी अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. एकीकडे सापाला शेतकर्याचा मित्र समजला जातो तर दुसरीकडे ६ फूट लांबीचा अजगर साप समोर दिसताच माणसाच्या हृदयाचे ठोके बंद पडतात.अशा परिस्थितीत विदर्भ इंडस्ट्रीज कंपनीत सायंकाळी अंधाराच्या वेळी या सापाला पाहताच सर्वत्र खळबळ उडाली असता कंपनीचे सुरक्षा कर्मचारी मारोती मसराम व गुलाब रहांगडाले यांनी तात्काळ टाकळघाट येथील सर्प मित्र निखिल डाखोळे यांना फोनवरून या सापाविषयी माहिती दिली असता निखिल आपले दोन सहकारी यांना सोबत घेत घटनास्थळी पोहोचला. निखिल व त्यांच्या मित्राने तब्बल एक तास सर्च ऑपरेशन करून सापाचा शोध घेत काळ्या चट्टेदार रंगाच्या या ६ फूट लांबीच्या अजगरला सर्पमित्र निखिल डाखोळे ने मोठ्या शिताफीने पकडले.व त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय,बुटीबोरी, खैरी येथे वनविभागाच्या स्वाधीन केले.
निखिल डाखोळे (सर्पमित्र टाकळघाट )
आपला एक फोन कॉल सापाचे प्राण वाचाऊ शकते.
साप या प्राण्यामध्ये विविध प्रकारच्या प्रजाती पाहायला मिळतात म्हणून आपणास कोणत्याही प्रकारचा लहान अथवा मोठा साप आढळल्यास तो विषारी आहे हे स्वतःच्या मनी निश्चित न करता व त्या सापाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता तात्काळ आपल्या परिसरातील सर्प मित्राची मदत घेऊन त्या सापाला जीवनदान द्यावे.सोशल मीडिया वर आपल्या परिसरातील अनेक सर्प मित्रांचे नम्बर दिले आहेत.