समर्पण फाऊंडेशन सावनेर तर्फे तालुका स्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन

-दिनेश दमाहे

सावनेर – सावनेरात आज 164 स्पर्धकांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त समर्पण फाऊंडेशननी आयोजित तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत नोंदणी केली. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. जगदीश कोकाटे साहेब, प्रमुख दिवाणी न्यायाधीश, सावनेर ह्यांच्या मंगल हस्ताने झाले. त्यांनी सर्व मुलांनी शिवाजी महाराजांच्या चरित्रा पासून तसेच प्रमुख वक्ते  संजय भेलकर सर व प्रा. प्रथमेश देशपांडे ह्यांनी सर्व स्पर्धकांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्श चरित्राचे मनोहर व मोहक वर्णन केले.

कार्यक्रमाला लाभलेले परीक्षक चित्रकार प्राध्यापक डॉ. शशीकांत शे. रेवडे,प्राचार्य श्री कला महाविद्यालय यांनी “चित्रकला ही एका बिंदू पासून रेघा पर्यंत, रेघा पासून आकृती पर्यंत व आकृती पासून रंग, पोत व भाव ह्यांच्या सोबत जिवंत होते” असे सांगितले. तसेच “चित्रकार महिन्याला किती कमावतो हा योग्य प्रश्न नाही, त्याला एकदा कलेचा गंध सापडला की तो शंभर लोकांना पोसू शक्यतो. “असे मोलाचे मार्गदर्शन स्पर्धकाला केले.

पाषाण युगातील एक चित्र त्या संपुर्ण कालखंडाचे दर्शन घडविते. करिता Fine Arts समजण्यासाठी पैसाचा तराजू फार छोटा आहे. मुलांना चित्रकलेत समोर जाऊ द्या व स्वतः चा शोध घेऊ द्या असे आवाहन पण त्यांनी केले.

या तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांना शारीरिक अंतरावर व सुरक्षा नियमाने बसविण्यात आले.

कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी फाऊंडेशन सावनेर चे अध्यक्ष अँड. अभिषेक मुलमुले यांनी सचिव कुलभूषण नवधिंगे, कोषाध्यक्ष  तुषारजी उमाठे, उपाध्यक्ष डॉ. नितीन पोतडे, सहसचिव  विनोदजी बागडे, डॉ.विलास मानकर,  प्रविण नारेकर,  मंदार मंगळे, . नरेंद्र ठाकूर, मनीष चित्तेवार व इतर मान्यवर यांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचलनअभिषेक सिंघ यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ. राहुल दाते यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शिवाजी महाराज शक्ती, भक्ती, बुद्धी व युक्तीचा संगम

Sun Feb 20 , 2022
मुंबई – भारताच्या विविध प्रांतांमध्ये धुरंधर योद्धे होऊन गेले. परंतु छत्रपती शिवाजी महाराज शक्ती, भक्ती, बुद्धी व युक्तीचा संगम असलेले तेजःपुंज राष्ट्रीय नेते होते. शिवाजी महाराजांसारखे प्रेरणादायी नेते अनेक युगांनंतर जन्म घेतात. महाराजांचे अपुरे स्वप्न पूर्ण करणे हेच त्यांना सच्चे अभिवादन ठरेल,  असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवसंग्राम या सामाजिक संघटनेच्या वतीने शिवाजी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com