सालवा ला बकऱ्या च्या गोट्यातुन २२ बकऱ्या चोरी 

फिर्यादी च्या तक्रारीने कन्हान पोलीस स्टेशन ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. 
 
कन्हान : –  पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस ११ कि मी अंतरावर असलेल्या मौजा सालवा येथे घराच्या बाजु ला असलेल्या बकऱ्याच्या गोट्यातुन कोणीतरी अज्ञात आरोपी ने २२ बकऱ्या चोरून नेल्याने कन्हान पोली सांनी फिर्यादी च्या तक्रारीने कन्हान पोलीस स्टेशन ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
           प्राप्त माहिती नुसार हनुमंता रामरावजी वैद्य राह. सालवा हा बकरी पालनाचा व्यवसाय करीत असुन मंगळवार (दि.२२) फेब्रुवारी ला रात्री ३ वाजता  दरम्यान हनुमंता वैद्य यांच्या घराच्या बाजुला असले ल्या बकऱ्याच्या गोट्याचे फाटक उघडुन २२ बकऱ्या किंमत २,६०,००० रुपयांच्या मुद्देमाल कोणीतरी अज्ञा त चोराने चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी हनुमंता रामरावजी वैद्य यांच्या तोंडी तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ४६१, ३८० भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आरोपीचा शोध घेत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आयुर्वेदाला सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी आयुर्वेद संस्था, चिकित्सकांनी संकल्प करावा: राज्यपाल

Wed Feb 23 , 2022
 मुंबई – आयुर्वेद हे भारताचे प्राचीनतम शास्त्र आहे.  आज करोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच कर्करोगावर उपचारासाठी आयुर्वेद संस्थां मोठ्या प्रमाणावर संशोधन करीत आहेत. भारताचा योग ज्याप्रमाणे जागतिक स्तरावर गेला आहे, त्याप्रमाणे आयुर्वेदाला सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी आयुर्वेद संस्थांनी तसेच आयुर्वेद चिकित्सकांनी संकल्प करावा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. आयुष मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय आयुर्वेद संशोधन परिषदेच्या वतीने कोविड प्रतिबंधक ‘आयुरक्षा किट’ मोफत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com