राजधानीत शहीदांना अभिवादन

नवी दिल्ली :- भारतीय स्वातंत्र्य लढयात अमूल्य योगदान देणारे शहीद भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना शहीद दिनानिमित्त महाराष्ट्र सदन येथे आज अभिवादन करण्यात आले.

कॉपर्निकसमार्ग मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त रूपिंदरसिंग यांनी शहीद भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार व स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांनी शहीदांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी महाराष्ट्र सदनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोरवाल महाविद्यालयात शहीद दिनानिमित्त वीरांना अभिवादन!

Sat Mar 23 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या विशेष दिवस कार्यक्रम समिती व इतिहास विभागातर्फे 23 मार्च रोजी शहीद दिनी देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद-ए-आझम भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना आदरांजली वाहण्यात आली. शहीद शहीद-ए-आझम भगतसिंग आणि सुखदेव राजगुरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे समन्वयक व इतिहास विभाग प्रमुख डॉ.जितेंद्र सावजी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com