संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– आंबेडकरी चळवळीचा होतकरू आधारस्तंभ हिरावला-ज्येष्ठ समाजसेवक नारायण नितनवरे
कामठी :- आंबेडकरी चळवळीचे कर्मठ व निष्ठावंत कार्यकर्ता , बहुजन रिपब्लिकन एकता मंच चे पदाधिकारी व कामठी नगर परिषद चे माजी नगरसेवक मोरेश्वर तुकाराम पाटील हे मनमिळाऊ व्यक्तिमत्त्वाचे धनी होते यासह यांना नगर परिषद प्रशासनाचा दांडगा अनुभव असून माजी राज्यमंत्री ऍड. सुलेखा कुंभारे यांचा निष्ठावंत कार्यकर्ता होते तर मोरेश्वर पाटील यांच्या झालेल्या काळाच्या झडपीत 27 मार्च रोजी अचानक देवाज्ञा झाल्याने एक सच्चा आंबेडकरी विचारधारेचा कार्यकर्ता तसेच आंबेडकरी चळवळीतील होतकरू आधारस्तंभ हिरावला असल्याचे मौलिक मत ज्येष्ठ समाजसेवक नारायन नितनवरे यांनी माजी नगरसेवक मोरेश्वर पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरण कार्यक्रमा निमित्त आयोजित सामूहिक श्रद्धांजली कार्यक्रमात व्यक्त केले.
आज 27 मार्च ला दिवंगत मोरेश्वर पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरण कार्यक्रमा निमित्त त्यांच्या निवासस्थानी वर्षा मोरेश्वर पाटील,कुणाल पाटील तसेच माही पाटील यांच्या मुख्य उपस्थितीत विशेष बुद्ध वंदना घेऊन सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.याप्रसंगी माजी नगरसेवक अविनाश उकेश यांनी सांगितले की दिवंगत मोरेश्वर पाटील हा माझ्या राजकीय जीवनातील सहपाठी असून रक्ताच्या नात्यापेक्षाही मोठे असलेले भावनिक होते. मोरेश्वर पाटील आपल्या कर्तव्याशी सतत न्याय करीत नगरसेवक रूपाने नागरिकांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने पुढाकार घेत होता. मनमिळाऊ,कर्मठ ,न्यायप्रिय ,कर्तव्यदक्ष, तटस्थ अश्या स्वभाव रुपी व्यक्तिमत्व असलेले मोरेश्वर पाटील आज आपल्यात नाही याचा आज तीन वर्षे लोटल्यावरही विश्वास बसत नाही याप्रसंगी उपस्थित स्नेहांकीत मित्र मंडळींनी त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकीत समयोचित विचार व्यक्त केले.
याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक नारायण नितनवरे,कुणाल पाटील,कामठी नगर परिषद चे माजी नगराध्यक्ष नीरज यादव, कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष अजय कदम,माजी नगरसेवक अविनाश उकेश,माजी नगरसेवक प्रमोद उर्फ दादा कांबळे,माजी नगरसेवक मुकुंद यादव,माजी नगरसेवक संतोष यादव,माजी नगरसेवक नियाज अहमद,माजी नगरसेवक विकास रंगारी,माजी नगरसेवक तिलक गजभिये,माजी नगरसेवक राजू देशभ्रतार,माजी नगरसेविका प्रतिभा देशभ्रतार, जितू गेडाम, संजय गांधी निराधार योजना कामठी तालुक्याचे माजी अध्यक्ष प्रमोद खोब्रागडे, समाजसेवक राजेश गजभिये, आशिष मेश्राम,राजेश नागदेवें,गीतेश सुखदेवें,राजन मेश्राम, सुमित गेडाम, अनुभव पाटील,दिनेश पाटील ,आनंद गेडाम ,सुरेंद्र यादव, आदी उपस्थित होते.