सभागृहाला नाव देणे हा ताराचंद हिकरे यांच्या कर्तृत्वाचा गौरव

– माढेळी येथे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली भावना

चंद्रपूर :- ताराचंद हिकरे सोन्याच्या हृदयाचे नेते होते. हिकरे यांच्यासारख्या नेत्यांनी निःस्वार्थ पक्षप्रेम आणि राष्ट्रभक्ती केली. त्यांनी आपले संपूर्ण जीवन पक्षासाठी समर्पित केले. माढेळीतील सभागृहाला त्यांचे नाव देणे म्हणजे त्यांच्या कार्यकतृत्वाचा गौरव आहे, अशा भावना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

वरोरा तालुक्यात असलेल्या माढेळी येथे स्व. ताराचंद हिकरे सभागृहाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी रोहिणी देवतळे, चंद्रकांत गुंडावार, बाबासाहेब भागडे, डॉक्टर भगवान गायकवाड, माढेळीचे सरपंच देवानंद महाजन , उपसरपंच वनिता हुलके , प्रकाशजी मुथा,केशव बोरीकर,अमित चवले,गटविकास अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, ‘ताराचंद हिकरे यांचे नाव मिळाल्याने माढेळीतील सभागृहाची शान वाढणार आहे. त्यातून भविष्यातील पिढ्यांनाही ताराचंद हिकरे यांच्या निस्वार्थ सेवाभावाची प्रेरणा मिळत राहील.’ भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हिकरे परिवाराच्या पाठीशी उभा राहिल, अशी ग्वाही देखील ना. मुनगंटीवार यांनी दिली. पक्षनिष्ठा कशी असावी आणि मनाचा मोठेपणा कसा असावा, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ताराचंद हिकरे आहेत. महाविद्यालयीन जीवनात त्यांच्यासोबत माझा संपर्क आला. त्यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळाले, अशी आठवणही ना. मुनगंटीवार यांनी सांगितली.

निधी अपुरा पडणार नाही

ताराचंद हिकरे यांचे व्यक्तिमत्व परिसासारखे होते. त्यामुळे त्यांच्या गावाच्या विकासासाठी ग्राम पंचायत आणि नागरिक जी काही मागणी करतील, ती पूर्ण करेन. माढेळी येथील सभागृहासह परिसरातील विकासासाठी कधीही निधी कमी पडणार नाही, असेही ना.मुनगंटीवार म्हणाले. हिकरे हे सेवाभावाने कार्य करणाऱ्या भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आदर्श आहेत, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

देखभालीसाठी समिती नेमावी

माढेळी येथील सभागृहाच्या देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी समिती नेमण्याच्या सूचना मंत्री महोदयांनी दिल्या. समाजातील गरीबांना अत्यंत माफक दरात सभागृह उपलब्ध करून देण्यात यावे. सभागृहाच्या शेजारी मोकळी जागा आहे. तेथे सौर ऊर्जा पॅनल उभारण्यात यावे. यासाठी लागणारे सहकार्य मी करेन, असेही मुनगंटीवार म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे केंद्राकडून महाराष्ट्राला मिळाले रुपये ४०१ कोटीचे थकीत अनुदान!

Wed Aug 28 , 2024
– केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मुनगंटीवारांनी मानले आभार – राज्यातील नगरपरिषदांच्या विकासाला मिळणार गती चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्याला १५ व्या वित्त आयोगाच्या अनुषंगाने मिळणाऱ्या निधीचा मार्ग वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यावासाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे सुकर झाला आहे; केंद्रीय अर्थमंत्री ना. निर्मला सीतारामन यांनी स्वतः फोन करून महाराष्ट्राला ४०१ कोटीचे थकीत अनुदान देत असल्याची माहिती ना. मुनगंटीवार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!