नागपूर :- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महावितरणतर्फ़े त्यांना अभिवादन करण्यात आले. महावितरणच्या काटोल मार्गावरील विद्युत भवन येथील मुख्यालयात प्रादेशिक संचालक सुहास रंगारी आणि नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी अधीक्षक अभियंता सर्वश्री राजेश नाईक, मंगेश वैद्य, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) अतुल राऊत, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने यांचेसह अभियंते, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.