कन्हान, कांद्री परिसरात संत जगनाडे महाराजाना अभिवादन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- परिसरात संत जगनाडे महाराज यांचा पुण्यतिथी निमित्य त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पित करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.

तेली समाज पंच कमेटी द्वारे संत जगनाडे महाराज यांचा पुण्यतिथी निमित्य कार्यक्रमाचे आयोजन संताजी सभागृह मंदिरात करण्यात आला. कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित संस्थेचे अध्यक्ष शरद डोणेकर यांचा हस्ते संत जगनाडे महाराज यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.यावेळी कांद्री ग्रा पं माजी सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी जगनाडे महाराज यांचा जीवन चिरित्रवार उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी जगनाडे महाराज यांचा प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले. तसेच हनुमान मंदिर कांद्री संत जगनाडे महाराज यांचा पुण्यतिथी निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करून कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित परमात्मा एक मंडळ कांद्री अध्यक्ष रामभाऊ सावरकर यांच्या हस्ते जगनाडे महाराज यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी कांद्री ग्रा पं माजी सदस्य प्रकाश चाफले, सामाजिक कार्यकर्ता संकेत चकोले यांनी जगनाडे महाराज यांचा जीवन चिरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपस्थित नागरिकांनी जगनाडे महाराज यांचा प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी वामन देशमुख, अशोक हिंगणकर, पतिरामजी देशमुख, ईश्वर काबळे, रविंद्र काबळे, सुरेंद्र पोटभरे, विजय आकरे, विक्रम वांढरे, लक्ष्मीकांत गिरडकर, शिवा चकोले, मनोज भोले, प्रशांत देशमुख, धनराज ढोबळे, लोकेश वैद्य, रोहित चकोले, श्याम मस्के, नाना आकरे सह नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पर्यटनातून रोजगार निर्मितीला चालना देणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sun Jan 14 , 2024
 नागपूर जिल्ह्याला 250कोटी तर भंडारा जिल्ह्याला 100 कोटी निधी  अंभोरा येथे वैनगंगा नदीवरील केबल-स्टेड पुलाचे लोकार्पण  विदर्भातील जल पर्यटनाला नवी दिशा मिळणार  अंभोरा केबल-स्टेड पुल म्हणजे ‘स्टेट ऑफ आर्ट’ नागपूर :- पर्यटनातून रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी 350 कोटीचा विशेष विकास आराखडा तयार करण्यात आला आहे, याअंतर्गत भंडारा जिल्ह्याला 100 कोटी तर नागपूर जिल्ह्याला 250 कोटी निधी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com