साहेब, थांबवा हो या भेसळीला

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- दैनंदिन जीवनावश्यक वस्तू खाद्यपदार्थ व दुग्धजन्य पदार्थामध्ये दिवसेदिवस वाढत जाणाऱ्या भेसळीमुळे सर्वसामान्य जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे .माणसाचे सरासरी आयुष्यमान 100 वर्षाचे असताना ते आता 70 वर्षावर आले आहे .या घटत्या आयुर्माणाला 10 टक्के अन्न भेसळ तसेच दुग्ध भेसळ जवाबदार असल्याचे एका तज्ज्ञाच्या पाहणीत सिद्ध झाले आहे तेव्हा साहेब थांबवा हो या अन्न व दुग्ध भेसळी ला अशी हाक जागरूक नागरिक करीत असून हे भेसळ भ्रष्टाचारा पेक्षाही भयानक ठरत आहे.

माणसाला जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक जीवणावश्यक वस्तूमध्ये भेसळ होऊन ती सर्वांच्या घशात उतरविली जात असल्याने परिणामी महिला , मुले आजारी पडल्याचे निदर्शनास येते .येथील व्यापरिवर्ग नफेखोरीच्या हेतूने विवंश झालेला आहे .दररोजच्या अन्नबरोबर आपण अक्षरशः विष खात आहोत तसेच दैनंदिन वापरण्यात येणाऱ्या दुग्ध भेसळीच्या माध्यमातून व्यापारी ,कारखानदार, गबबर होत असले तरी या भेसळीला बळी पडलेला माणूसमात्र लवकरच आयुर्माणपूर्वीच मृत्यूपंथास जात आहे.आज सर्वानाच चवदार जेवणाची सवय जडलेली असली तरी सर्वसामान्यता सनासुदीच्या काळात घराघरात गोड गोड तरण पुरण होत असते त्यासाठी लागणारा किराणा, धान्य, डाळीची खरेदी केली जाते मात्र सकाळच्या दुधापासून ते रात्रीच्या भेसळ केलेले दूधही अव्वाच्या सव्वा भावाने ग्राहकांना विकत घ्यावे लागत आहे .किराणा दुकानातील अनेक वस्तूमध्ये खाद्यतेलात मोठ्या प्रमाणावर भेसळ करून माणसाच्या हृदयावरच व्यापारी ते कारखानदार घाला घालत आहेत धनिया पावडरमध्ये घोड्याचा लगदा, मिरची व हळद पावडर मध्ये रासायनिक रंग दिलेली चकचकीत पावडर वापरली जाते .तांदळामध्ये पांढरी रेती व इतर कडधान्यामध्ये मोठ्या प्रमाणात बारीक कांकर मिसळविल्या जातात केवळ चकचकीत पॅकिंग व टिव्हीवर येणाऱ्या आकर्षक जाहिरातीच्या मोहात पडून दररोज माणसे विष खात आहेत.

शासनाने खाद्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी ‘सेफ्टी अँड स्टॅंडर्ड ऍक्ट’या नव्या कायद्यात 26 हजार पदार्थांचा समावेश केला आहे.जेव्हा की पूर्वी ही संख्या केवळ 300 इतकी होती या कायद्यात भेसळ दंड म्हणून 25 हजार रुपयांपासून 10 लक्ष रुपया पर्यंतचा दण्ड व जन्मठेपेची शिक्षा सांगण्यात आलेली आहे .प्रत्येक व्यापाऱ्यांनि वजन काट्याची संबंधित विभागाकडे नोंद करून वजन काट्याची निश्चिती केली असली तरी दफतरी नोंदी नगण्यच आहे .भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडलेल्या मनुष्याने कित्येक शासकीय कार्यालयात नियमानुसार 50 रुपयांचे काम 100 रुपयात होत असले तरी 50 रुपये हे तुमच्या खिशातून भ्रष्टाचाराने काढले जात असून ते 50 रुपये मनुष्य पुन्हा कमवू शकतो मात्र भेसळयुक्त अन्न खाऊन शरीराची होत असलेली झीज आपण कशी काढणार?ही एक गंभीर बाब असली तरी व्यापारी वर्ग नफेखोरीच्या हेतूने पझाडलेला आहे तेव्हा येथील अन्न व औषधी प्रशासन विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसून येते.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खंडणी मागणाऱ्या आरोपीस अटक

Wed May 31 , 2023
नागपूर :- दिनांक २७.०५.२०२३ चे १४.३० वा. व दि. ३०.०५.२०२३ चे १६.०० वा. चे दरम्यान पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत बाळाभाऊ पेठ, संताजी मठ, बब्बू मेंबरचे घराजवळ राहणारे फिर्यादी रवि दिपक समर्थ वय २४ वर्ष. हे घरी असताना आरोपी प्रिंस प्रमोद चहादे वय २८ वर्ष रा. भिम नगर झोपडपट्टी, जरीपटका याने फिर्यादीस आवाज देवुन बोलाविले व त्यांना तु बहोत माल कमा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com